शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार स्कूलमध्ये बाल वैज्ञानिकांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 16:52 IST

टेक्नोवेशन-४ : साठ विज्ञान उपकरणांचा सहभाग

ठळक मुद्देविज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन चांदवड येथील नेमिनाथ जैन महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मनोज पाटील यांच्या हस्ते झाले.

कळवण : विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे ‘टेक्नोवेशन-४’ मध्ये शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात शालेय विद्यार्थांनी विज्ञानविषयक उपकरणे तयार करून आपल्यातील कल्पकतेचे प्रदर्शन घडविले आहे. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन चांदवड येथील नेमिनाथ जैन महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मनोज पाटील यांच्या हस्ते झाले.सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मानूर ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बोरसे उपस्थित होते. यावेळी डॉ. मनोज पाटील यांनी सांगितले, विज्ञानाचा शोध हे मानवासाठी उपकारक असावे , त्याचा दुरु पयोग करून निसर्गास व मानवास हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे . कुठल्याही वैज्ञानिक शोधाच्या मागे निसर्गाचा हात असतो. त्यामुळे विज्ञानासोबत पुढे जातांना निसर्गाच्या रक्षणाचेही भान राखण्याचेही त्यांनी आवाहन केले. ग्रामपंचायत सदस्य रविंद्र बोरसे यांनी शाळेने अशा प्रकारचे स्तुत्य उपक्र म राबवणे ही काळाची गरज असून , विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला संधी देत असल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे त्यांनी कौतुक केले. यावेळी शाळेचे संस्थापक डॉ. जे. डी. पवार, सचिव अनुप पवार, प्राचार्य बी. एन. शिंदे, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य जे. एल. पटेल, समन्वयक विश्वेशरण, विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश लांडगे , मंगेश भावसार तसेच शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते .विविध उपकरणांचे प्रदर्शनविज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी ६० पेक्षा जास्त समाजोपयोगी विज्ञान उपकरणे तयार करून मांडली आहेत. त्यात प्रामुख्याने, अ‍ॅक्सीडेंट प्रिव्हेंन्शन सिस्टम फ्लड अलार्म व रेस्क्यू सिस्टीम, विन्ड एनर्जी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट, कार्बन कलेक्टर, रोड क्लिनर, सोलर एरिगेशन प्रोसेस, पोपकोर्न मेकर , हायडॅÑलिक ब्रिज सारखे अनेक उपयुक्त उपकरणांचा समावेश आहे. सदर विज्ञान उपकरणे तयार करण्यासाठी शाळेचे विज्ञान शिक्षक अविनाश लांडगे , सुनिल नालकर, मिलिंद पोखरकर, ईश्वर पाटील, राहुल कलंके यांचे मार्गदर्शन केले .

टॅग्स :Nashikनाशिकscienceविज्ञान