शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोरं भुकेनं मरतील... सरकार पैसे द्या

By संजय पाठक | Updated: October 11, 2023 12:03 IST

अनाथ आणि विधी संघर्षित बालकांना सांभाळणाऱ्या राज्यातील सुमारे चाळीस संस्थांना १८ महिन्यांपासून परिपोषणाचा खर्च शासनाकडून मिळालेला नाही.

नाशिक : अनाथ आणि विधी संघर्षित बालकांना सांभाळणाऱ्या राज्यातील सुमारे चाळीस संस्थांना १८ महिन्यांपासून परिपोषणाचा खर्च शासनाकडून मिळालेला नाही. त्यामुळे या मुलांचे उदर भरण करणे, या संस्थांना कठीण झाले आहे. राज्यातील या संस्थांना महिला आणि बालकल्याण विभागामार्फत अनुदान दिले जाते. शासकीय अनुदान प्रतिविद्यार्थी साधारणत: शंभर रुपये असून, या शंभर रुपयांतच मुलांना चहापाणी, नाष्टा, दोन वेळचे भोजन देणे अपेक्षित आहे. महिला आणि बालकल्याण विभागामार्फत सुरुवातीला चार महिने, मग तीन महिने अशा प्रकारे अनुदान देतानाच विधी संघर्षित बालके किती दिवस त्या संस्थेत वास्तव्यास होती, याचा हिशेब करून उर्वरित अनुदान दिले जाते. मात्र, १८ महिन्यांपासून अनुदानच नाही. १ एप्रिलपासून एक रुपयाचेही अनुदान मिळालेले नाही. 

आमची विश्वस्त सेवाभावी संस्था आहे. त्यामुळे देणग्या घेऊन मुलांचा खर्च भागवत आहोत. मात्र, आता तो ओघही कमी झाला आहे. किराणा दुकानदारही किती दिवस उधारीत देणार, असा प्रश्न आहे. शासनाने अनुदान देण्याची गरज आहे. -एक संस्थाचालक, नाशिक

संबंधित संस्थांना टप्प्याने अनुदान दिले जाते. आठवडाभरात त्यांना त्यांचे प्रलंबित अनुदान मिळू शकेल. त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर कार्यवाही सुरू आहे.-सुनील दुसाने, प्रभारी जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी, नाशिक

टॅग्स :GovernmentसरकारMONEYपैसा