शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

बच्चे कंपनीला ३४ दिवस सुटी

By admin | Updated: April 8, 2016 00:02 IST

मज्जाच मज्जा : १ मे रोजीच जाहीर होणार निकाल

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वार्षिक परीक्षेला सुरुवात झाली असून, १ मे रोजी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर २ मे पासून ४ जूनपर्यंत शाळांना ३४ दिवस उन्हाळी सुटी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा २ ते १७ एप्रिल दरम्यान सुरू आहेत. त्यानंतर केवळ प्राथमिक शिक्षकांना शालेय कामकाजासाठी प्राथमिक शाळांमध्ये हजेरी लावणे आवश्यक असून, या काळात विद्यार्थ्यांना शाळेत येणे ऐच्छिक ठेवण्यात आल्याचे समजते. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर लगेचच वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. २ मेपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना सुटी देण्यात आली असून, ४ जूनपर्यंत ही ३४ दिवसांची सुटी राहणार आहे. प्राथमिक शाळा उघडल्यानंतर ६ ते १० जून दरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १५ जूनपर्यंत या सर्वेक्षणानुसार अहवाल तयार करून तोे विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांना सादर करावा लागणार आहे. मागील वर्षी उन्हाळी सुटी ९ मेपासून जाहीर करण्यात आली होती. यावर्षी मात्र ही सुटी (दि. २) सात ते आठ दिवस लवकर सुरू होणार आहे. तसेच १३ जूनला उघडणारी शाळा यावर्षी ६ जूनपासून उघडणार आहे. ५ जूनला रविवार असल्याने जि.प.च्या शाळा ६ जूनला उघडतील. (प्रतिनिधी)