शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
3
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
4
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
5
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
6
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
7
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
8
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
9
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
10
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
11
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
12
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
13
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
14
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
15
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
16
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
17
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
19
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
20
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ

बाबांमुळेच बालपण झाले समृद्ध

By admin | Updated: January 26, 2015 00:39 IST

प्रकाश आमटे : आठवणींनी उजळली ‘अरण्यातील प्रकाशवाट’

नाशिक : ताई आणि बाबांच्या सहवासात जंगलातच आमचे बालपण गेले. त्यामुळे बालपणीच्या फारशा आठवणी नाहीत, कुणी मित्रही नव्हते आणि विरुंगळाही. त्याकाळी बाबांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना पाहून आणि त्यांच्यातील चर्चा ऐकून मला समाजसेवेचे बाळकडू मिळाले, बाबांमुळेच बालपणही समृद्ध झाले, असे प्रकाश आमटे म्हणाले. सिनर्जी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘अरण्यातील प्रकाशवाट’ मुलाखत कार्यक्रमात आमटे यांनी आपले आयुष्य उलगडून दाखविले. मुग्धा जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत प्रकाश आणि मंदा आमटे यांची प्रकाशवाट आठवणींनी उजळून निघाली. मुलाखत आणि चित्रफित अशा आगळ्या-वेगळ्या मुलाखत कार्यक्रमात आमटे यांना आठवणीचा गहिवर आला.प्रकाश आमटे या चित्रपटाविषयी प्रश्न विचारला असता मंदाकिनी आमटे यांनी सांगितले की, जेव्हा समृद्धी यांनी आपणाला आपल्या जीवनावरील चित्रपटाविषयी विचारणा केली तेव्हा आपण तिला नकार दिला होता. अशा चित्रपटावर पैसा आणि वेळ खर्च करू नको असा सल्ला आपण दिला होता; कारण असले चित्रपट कुणी पाहत नाहीत असे मी म्हटले होते. परंतु सुदैवाने या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. तरुणांनी हा चित्रपट पाहणे म्हणजे तरुणांना आपल्या सामाजिक जाणिवा कळायला लागल्याचे दिसून येते. मला वाटतं हे या चित्रपटाचे मोठे यश म्हटले पाहिजे. समाजातील संवेदनशील लोक मला चांगले काम करण्याची प्रेरणा देत असतात. अनेक लोक आम्हाला आमच्या कामासाठी सर्वतोपरी मदत करीत असतात. यावेळी मंदा आमटे यांनी संगमनेर येथील एका मदतकर्त्याचे उदाहरण दिले. मदत कुणी किती दिली यापेक्षा कोणत्या भावनेने दिली हे महत्त्वाचे असते, असेही त्यांनी सांगितले. हेमलकसा येथे काम करण्याचे अनेक अनुभव आमटे यांनी कथन केले. प्रारंभी सिनर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप नाटकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन स्रेहा रत्नपारखी यांनी केले, तर आभार सिनर्जी फाउंडेशनचे पदाधिकारी हेमंत कुलकर्णी यांनी मानले. (प्रतिनिधी)