चांदोरी : येथील लोंढे वस्ती, ओणे वाट या परिसरात सायकल खेळत असताना कृष्णा लोंढे मुलगा रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात पडल्याने मरण पावला.शुक्र वारी (दि.६) संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास कृष्णा सुनील लोंढे (१३) हा सायकल सह नाल्यात पडला असता बाजूने जाणाऱ्या विक्र म कोरडे यांनी स्थानिक पोलीस पाटील अनिल गडाख व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे सागर गडाख यांना कल्पना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता सोमाणी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करताना त्याचा मृत्यू झाला.कृष्णा हा येथील रयतच्या शाळेत इयत्ता ८ वी मध्ये शिकत होता. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चांदोरीत मुलाचा नाल्यात बुडुन मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 19:20 IST
चांदोरी : येथील लोंढे वस्ती, ओणे वाट या परिसरात सायकल खेळत असताना कृष्णा लोंढे मुलगा रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात पडल्याने मरण पावला.
चांदोरीत मुलाचा नाल्यात बुडुन मृत्यु
ठळक मुद्देसिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करताना त्याचा मृत्यू झाला.