शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी वस्तीतील बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 17:45 IST

नांदगाव : एकाच कुटुंबातील तिघान्ाां जुलाब व उलट्यांचा त्रास

ठळक मुद्दे वस्तीतील आणखी दोघांना जुलाबाचा त्रास होत असल्याचे आढळून आले आहे, मात्र ही कोणत्याही प्रकारची साथ नसल्याचा खुलासा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : शासनाची आधुनिक वैद्यकीय सेवा अवघ्या काही किलोमीटर अंतरावर उपलब्ध असतानासुद्धा अज्ञानामुळे घरगुती उपचारामागे लागून त्यात बराच कालावधी गेल्याने आदिवासी वस्तीतील एका बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना नस्तनपूरमध्ये घडली. दरम्यान, या वस्तीवरील जुलाब व उलट्या होत असलेल्या दोघा जणांना येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे त्यांच्यावर उपचार करीत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान वस्तीतील आणखी दोघांना जुलाबाचा त्रास होत असल्याचे आढळून आले आहे, मात्र ही कोणत्याही प्रकारची साथ नसल्याचा खुलासा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी केला आहे.लसीकरणासाठी सदर वस्तीवर गेलेल्या पिंपरखेड प्राथमिक उपचार केंद्राच्या पथकाला सोनवणे यांच्या कुटुंबातील तिघांना जुलाब व उलट्यांचा त्रास होत असल्याचे दिसले. त्यापैकी रु पाली विष्णू सोनवणे (चार महिने) हिच्या तोंडातून रक्त व फेस येत असल्याने पथकातील मंडळींनी तिला ग्रामीण रु ग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, मात्र तिथे नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. शरीरातील रक्त खूपच कमी (हिमोग्लोबिन ३) व दुचाकीच्या सायलेन्सरचा चटका बसलेल्या उजव्या पायाच्या जखमेतून सेप्टीसेमिया होऊन तो संपूर्ण शरीरात पसरल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. बोरसे यांनी दिली.दरम्यान, रु पालीवर महिन्यापासून घरगुती उपचार सुरू होते. डॉक्टरकडे न नेता केवळ गावठी घरगुती उपचार करण्यात कालापव्यय झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. वैद्यकीय पथकामुळे ही बाब उघडकीस आली. मयत रुपालीची बहीण लक्ष्मी (६) व भाऊ लवा सोनवणे (१६) यांच्यावर उपचार सुरू आहेत.