शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 21:02 IST

परमोरीतील घटना : ग्रामस्थ भयभीत, पिंजरे लावण्याची मागणी

ठळक मुद्देयापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात म्हेळुस्केत श्रीरंग हर्षवर्धन खिरकाडे व लखमापूर येथील विवेक बिंद या बालकांचा मृत्यू झाला होता.

दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन वर्षातील ही तिसरी घटना आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, परमोरी शिवारात ज्ञानेश्वर दिघे यांच्या टमाटाच्या शेतात कुटुंबातील महिला सदस्य काम करत होते. शेजारीच लहान मुलेही खेळत होते. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास शेजारील उसातून बिबट्याने तेथे खेळत असलेल्या सार्थक ज्ञानेश्वर दिघे (वय ३) याच्यावर हल्ला चढवला आणि त्याच्या मानेचा लचका पकडत त्याला उसाच्या शेतात ओढत नेले. सदर घटना समजताच सार्थकची आई व आजीने आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरी जमा झाले आणि त्यांनी उसात शोध घेतला असता बिबट्याने धूम ठोकली. जखमी सार्थक यास तातडीने दवाखान्यात उपचारास नेण्यात आले परंतु, दिंडोरी ग्रामीण रु ग्णालयातील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार नरहरी झरिवाळ यांनी वनविभागाला सूचना देत तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात म्हेळुस्केत श्रीरंग हर्षवर्धन खिरकाडे व लखमापूर येथील विवेक बिंद या बालकांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Nashikनाशिक