शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीकर ‘घबाड’ प्रकरणातील फिर्यादच गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:30 IST

नाशिक : लाचलुुचपत खात्याच्या चौकशीत कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्याने राज्यभरात चर्चेत ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील निलंबित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या लाच प्रकरणाच्या फाईलीतील मूळ फिर्यादच गहाळ झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

नाशिक : लाचलुुचपत खात्याच्या चौकशीत कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडल्याने राज्यभरात चर्चेत ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील निलंबित कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या लाच प्रकरणाच्या फाईलीतील मूळ फिर्यादच गहाळ झाल्याचे धक्कादायक वृत्त आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयाकडे फाईल सुपूर्द करताना पाहिले असता ही बाब उघडझाली. अज्ञातांनी बनावट कागदपत्र फेरफार क रून फाईलमध्ये ठेवल्याचा संशय आहे.बांधकाम विभागाचे निलंबित अभियंता सतीश मधुकर चिखलीकर यांच्यासह शाखा अभियंता जगदीश वाघ यांना २०१३ साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांच्या निवासस्थानांची झडती घेतली असता कोट्यवधींचे घबाड हाती आले होते. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केले होते.सरकार पक्षाकडून अ‍ॅड. अजय मिसर कामकाज चालवित होते. दरम्यान, या खटल्यात संशयितांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मिसर यांनी या खटल्याची फाईल न्यायालयाकडे सुपूर्द करण्यापूर्वी पडताळून बघितली असता त्यामध्ये फिर्यादी इरफान यासीन शेख याची स्वाक्षरी असलेले दस्तऐवज गहाळ असल्याचे निदर्शनास आले. तसेच पंचाची साक्ष असलेल्या दस्तऐवजांवर कुठल्याही प्रकारच्या स्वाक्षऱ्या नसल्याचेही आढळले. त्यामुळे मिसर यांनी सदर बाब न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिली. न्यायाधीश शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत खटला सत्र न्यायालयाकडून जिल्हा न्यायाधीश पी. आर. देशमुख यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी गंभीर दखल घेत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा व प्रधान न्यायालयाच्या आदेशान्वये न्यायालयीन कर्मचारी दिलीप जाधव यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल क रण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. ए. शेळके करीत आहेत.मूळ मजकुरातही फेरफारमूळ तक्रारीमधील मजकु रातही फे रफार करण्याचा प्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. तक्रारीची सही-शिक्का असलेली नकल प्राप्तीसाठी करण्यात आलेल्या अर्जाच्या नोंदवहीतही व्हाईटनरचा वापर करत खाडाखोड केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात संशयाची सुई न्यायालयीन कर्मचारी वर्गासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस आणि आरोपीवरही आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा