शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
4
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
5
IND vs SA 2nd Test : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! पहिल्या डावात द.आफ्रिकेची मोठी धावसंख्या
6
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
7
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
8
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
9
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
10
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
11
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
12
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
13
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
14
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
16
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
17
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
18
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
19
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
20
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाला हिंसक वळण लागल्यास मुख्यमंत्री जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:54 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी येत्या ९ आॅगष्ट रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभुमीवर नाशिक तालुक्यातील गावागावात समितीने बैठका सुरू केल्या

ठळक मुद्देनाशिक ग्रामपंचायतींचे ठराव : मराठा जेलभरोसाठी गावोगावी बैठकाआंदोलनातील सहभागी एकही कार्यकर्ता हातात दगड, विटा घेणार नाही अशी शपथ

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यामागणीसाठी येत्या ९ आॅगष्ट रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याने त्या पार्श्वभुमीवर नाशिक तालुक्यातील गावागावात समितीने बैठका सुरू केल्या असून, मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलनातील सहभागी एकही कार्यकर्ता हातात दगड, विटा घेणार नाही अशी शपथ घेतांनाच जर पोलीस बळाचा वापर करून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निश्चित करण्याचे ठराव करण्यात आले आहेत.मंगळवारी रात्री नाशिक तालुकास्तरीय बैठक पश्चिम पट्टयातील गिरणारे येथील गायत्री लॉन्स येथे घेण्यात आली. याबैठकीत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, शिवाजी चुंभळे, राजू देसले, गणेश कदम, आशिष हिरे यांनी चक्काजाम आंदोलनाची आचारसंहिता ठरवून दिली. त्यात प्रामुख्याने ‘जो हातात दगड घेईल तो मराठा नाही’ असे समन्वयकांनी उपस्थितांना शपथ दिली. यावेळी मार्गादर्शन करताना शिवाजी चुंबळे यांनी, इतरांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य आंदोलनाच्या ठिकाणी कोणीही करू नये, तसेच चुकीच्या घोषणा देऊन इतर समाज दुखवणार याची काळजी घ्यावी, हिंसाचार करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, आत्तापर्यंत समाजाने शांततेच्या आणि संयमाचा भूमिकेत आंदोलन यशस्वी केल्याने येणाऱ्या काळात आणखी जोमाने आणि यशस्वी आंदोलन करण्यासाठी जिल्हा समन्वयकांनी घातलेली आचारसहिता पाळावी असे आवाहन केले.सर्व पक्षीय झालेल्या या बैठकीला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अनेकांनी चक्काजाम आंदोलनात घरातील मुलं, महिलांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार असे जाहीर केले. तसेच ग्रामपंचायतीचा ठराव करून ९ आॅगस्टला शांततेत केल्या जाणाºया आंदोलनाला गालबोट लावले किंवा बळाचा वापर करून हिंसाचार निर्माण केला तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निश्चित करून त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करावे असा ठराव करून मुख्यमंत्री कार्यलयात पाठवण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.बैठकीस दिलिप शंकरराव थेटे, युवराज कोठुळे, तानाजी गायकर, शशीआप्पा थेटे, विकी दिलीपराव थेटे, हरीभाऊ गायकर, संजय संतु थेटे, राहुल दौलतराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब लांबे, विलास सांडखोरे,आनिल थेटे, राम खुर्दळ यांच्यासह गिरणारे, दुगाव, वाडगाव, साडगाव, धोंडेगाव, मनोली, दरी, मातोरी, महादेवपुर, मुंगसरा, चांदशी, जलालपुर आदी पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिीत होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNashikनाशिक