नाशिक : मनमानीपणे शासकीय कामकाज करून पदाचा दुरुपयोग करण्याबरोबरच लोकप्रतिनिधींचा उपमर्द व सहअधिकाºयांच्या अपमानात धन्यता मानणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची शासनाने तडकाफडकी बदली केल्याने जिल्ह्यातील कामचुकार अधिकाºयांना मोठा धडाच मिळाला असून, मीणा प्रकरणात लोकप्रतिनिधींनी दाखविलेली एकजूटच कामी आल्याने नजीकच्या काळात सनदी अधिकाºयांकडून लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक मिळण्याची अपेक्षा बळावली आहे.पदभार घेतल्यापासूनच मीणा यांच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. प्रारंभी या तक्रारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांपर्यंतच मर्यादित असल्याने त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही, परंतु नंतर मीणा यांनी आमदार व खासदारांनाही त्याच तराजूत तोलण्यास सुरुवात केल्याने त्यातून आमदार अनिल कदम यांच्याशी त्यांची हुज्जतही झाली होती. लोकप्रतिनिधींना कस्पटासमान समजणाºया मीणा यांनी आपल्या हाताखालील अधिकारी व कर्मचाºयांनाही तुच्छतेची वागणूक देण्यास सुरुवात केल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण जिल्हा परिषदेच्या व पर्यायाने ग्रामीण विकासाच्या कामांवर झाला. गेल्या सहा महिन्यांपासून मीणा यांचा वारू बेफाम उधळत असताना तत्कालीन विभागीय आयुक्तांनीही त्यांच्या या कृत्याकडे दुर्लक्षाची भूमिका घेतली, मात्र महेश झगडे यांनी आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर मीणा यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागली. कुपोषणासारख्या संवेदनशील विषयाप्रती मीणा यांची उदासीनता, ग्रामपंचायती व आदिवासी विकास विभागाच्या कामांचा खेळखंडोबा झगडे यांनी गांभीर्याने घेत मीणा यांना कार्यपद्धती दुरुस्त करण्याची संधी दिली. परंतु मीणा यांनी त्याचेही राजकारण करीत कामचुकारपणा झाकण्याचा प्रयत्न केला. मीणा यांच्या विरोधात ग्रामसेवक व अधिकाºयांनीही असहकाराचे अस्त्र उपसले, तर लोकप्रतिनिधींनीही थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्यामुळे सरकारला दखल घ्यावी लागल्याने मीणा यांची उचलबांगडी करण्यात आली. जिल्ह्यात आरएएस अधिकाºयाची बदली होण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यामुळे मीणा यांच्यासारख्या आयएएस अधिकाºयांना धडा मिळाला आहे.शिष्टाई असफलमीणा यांच्या करिअरची चिंता लागून राहिलेल्या जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी व ग्रामसेवकांची समजूत काढताना मीणा यांची बाजू लावून धरली व मध्यस्थीही केली होती; परंतु अखेर सरकारनेच मीणा यांच्याविषयी असलेल्या वाढत्या तक्रारींची दखल घेत त्यांची बदली केल्याने शिष्टाई असफल ठरली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या बदलीने अधिकाºयांना चपराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:42 IST
नाशिक : मनमानीपणे कामकाज करून लोकप्रतिनिधींचा उपमर्द व सहअधिकाºयांच्या अपमानात धन्यता मानणारे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची शासनाने तडकाफडकी बदली केल्याने कामचुकार अधिकाºयांना धडाच मिळाला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या बदलीने अधिकाºयांना चपराक
ठळक मुद्देविकास विभागाच्या कामांचा खेळखंडोबाकामचुकारपणा झाकण्याचा प्रयत्न