शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मनुवाद्यांकडून घटनेला नख लावण्याचा प्रयत्न :  छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:22 IST

नाशिक : देशात स्वातंत्र्य समता व बंधुता प्रस्थापित करणाऱ्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेस सत्ताधारी मनुवादी हे नख लावण्याचा प्रयत्न ...

नाशिक : देशात स्वातंत्र्य समता व बंधुता प्रस्थापित करणाऱ्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेस सत्ताधारी मनुवादी हे नख लावण्याचा प्रयत्न करीत असून, घटनेत बदल न करता तिचे उल्लंघन करण्याचे काम सतत सुरू आहे़बहुजन समाजात भांडणे लावून राज्य करू पाहणाºया या मनुवाद्यांना डॉ़ आंबेडकर यांच्याच शिका, संघटित व्हा व संघर्ष करा यानुसार लढा देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी केले़ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे शनिवारी (दि़२४) शहरातील शालिमार येथे आयोजित संविधान जागर सभेत ते बोलत होते़  भुजबळ म्हणाले की, संपूर्ण जगाने मान्य केलेल्या भारतीय संविधानाने देशातील कोट्यवधी लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहे़ फुले, शाहू, आंबडेकर यांनी घालून दिलेले समतेचे चक्र उलट्या दिशेने फिरविण्याचे काम मनुवादी सत्ताधारी करीत आहेत़ डॉ़ आंबेडकरांची घटना बदलण्यासाठीच आमची सत्ता असल्याचे वक्तव्य मंत्री करतात़  बहुजनांचे अधिकार कमी करण्याचा त्यांचा कट असून, राजधानी दिल्लीत संविधान जाळले जाते, मात्र गुन्हा दाखल होत नाही़, तर दुसरीकडे संभाजी भिडेसारखे मनुवादी आंब्याच्या माध्यमातून बहुजन समाजाला पुन्हा अंधश्रद्धेकडे घेऊन जात आहेत, त्यामुळेच संविधान जागर हा महत्त्वाचा  आहे़शिक्षण, संपत्तीचा अधिकार नाकारणारा तसेच महिला व माणसांना जनावरांसारखी वागणूक देणाऱ्या मनुग्रंथ जाळण्याचे काम यापुढे समता परिषदेच्या कार्यक्रमात प्रथम केले जाईल़ देशाची घटना अखेरपर्यंत मजबुत ठेवण्यासाठी मनुवाद्यांना खाली खेचण्याचे आवाहन भुजबळ यांनी यावेळी केले़राष्टीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी संविधान जागर सभा या कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू सांगितला़यावेळी व्यासपीठावर अ‍ॅड़ रवींद्र पगार, नगरसेवक कविता कर्डक, पोपटराव सोनवणे, अशोकराव भोगले, लक्ष्मीकांत बेडसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते़  कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला़ यावेळी साजन बंद्रे व त्यांच्या सहकाºयांनी सादर केलेल्या भीमगीतांना नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली़ यावेळी गिरीश अकोलकर, बाबासाहेब साळवे, प्रशांत कटारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़  

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक