शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
3
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
4
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
5
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
6
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
7
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
8
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
9
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
10
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
11
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
12
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
13
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
14
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
15
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
16
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
17
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
18
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
19
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
20
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...

शेतकऱ्यांकडील सक्तीची वसुली थांबवा छगन भुजबळ : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा ठराव

By admin | Updated: July 19, 2014 01:09 IST

शेतकऱ्यांकडील सक्तीची वसुली थांबवा छगन भुजबळ : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा ठराव

नाशिक : लांबणीवर पडलेला पाऊस, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य, चाऱ्याचा प्रश्न व विजेचे भारनियमन अशा चौफेर संकटात शेतकरी असताना जिल्हा बॅँकेकडून केली जात असलेली सक्तीची वसुली थांबवा, अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्यास सरकार काहीच मदत करणार नाही, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. धरणांमध्ये जेमतेम सात टक्के पाणी साठा व वाया गेलेल्या पेरण्या पाहता जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचा ठरावही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातील पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थितीचा भुजबळ यांनी आढावा घेतला. त्यात जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी वस्तुस्थिती कथन केली. जवळपास ६६१ गावांना १९७ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, धरणांमध्ये जेमतेम सात टक्के इतका पाणी साठा शिल्लक असल्याचे, तर पाच टक्के पेरण्या झाल्याचे त्यांनी सांगितले. (पान ७ वर)त्यावर भुजबळ यांनी, अनेक गावांना टॅँकर मंजूर असूनही प्रत्यक्षात टॅँकर जात नसल्याच्या तक्रारी असल्याने टॅँकरची संख्या वाढविण्याची सूचना केली. जिल्ह्णातील नगरपालिका व महानगरपालिकांना आॅगस्टअखेर पाणी पुरू शकेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्णात मुबलक चारा असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आल्यावर लोकप्रतिनिधींनी धारेवर धरले. चारा कोठे आहे अशी विचारणा करून आमदार शिरीष कोतवाल यांनी, चांदवड तालुक्यातील शेतकरी पाच-पाच हजार रुपये मोजून चारा खरेदी करीत आहेत, जर शासनाकडे चारा आहे तर तो शेतकऱ्यांसाठी खुला करावा, अशी मागणी केली. पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले व प्रत्यक्ष चारा आहे किंवा नाही याची पाहणी करून सप्टेंबरपर्यंत पाऊस आलाच नाही तर काय नियोजन करता येईल याचाही अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चाऱ्याचा आढावा घेऊन प्रसंगी छावण्या उघडण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. आमदार ढिकले यांनीही या विषयाला अनुसरून एकंदर परिस्थिती पाहता, जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून ठराव करा व सरकारकडे पाठवा जेणेकरून, शासन काही तरी उपाययोजना करू शकेल असे सांगितले. आमदार ए. टी. पवार यांनी त्यास अनुमोदन दिले, तर अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी, पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट असल्याचे सांगितले.