शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

सिंधी समाजाचा वार्षिक महोत्सव चेट्रीचंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 18:53 IST

सिंधी नववर्ष म्हणून चेट्रीचंड महोत्सव शनिवारी (दि. ६) साजरा करण्यात येत आहे. सिंधी समाजाचे कुलदैवत पूज्य झुलेलाल यांचा जन्मदिवस ‘चेट्रीचंड’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त...

ठळक मुद्देफाळणी झाल्यानंतर आजतागायत चेट्रीचंड साजरा होतो.हा सण शेती उत्सवापैकी एक आहे.सिंधी दिवस म्हणून साजरा केला जातो

 

सिंधी नववर्ष म्हणून चेट्रीचंड महोत्सव शनिवारी (दि. ६) साजरा करण्यात येत आहे. सिंधी समाजाचे कुलदैवत पूज्य झुलेलाल यांचा जन्मदिवस ‘चेट्रीचंड’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त...सिंधी समाज हिंदू कॅलेंडर विक्रम संवत, हिंदू राजा विक्रमादित्य यांच्या आधारावर चालते व सिंधी महिन्यांची नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याने होते. सिंधी समाजामध्ये याला ‘चेट्र’ असे म्हणतात व चेट्रीचंड हा पवित्र दिवस सिंधी समाजाचे कुलदैवत पूज्य झुलेलाल यांचाही जन्मदिवस आहे म्हणूनच हा दिवस सिंधी समाजासाठी खास असतो. भारताच्या इतिहासात वीर छत्रपती शिवाजी महाराज, पंजाबचे महान गुरू गोविंदसिंह, राजस्थानचे बहादूर महाराणा प्रताप सिंह यांचे नाव ज्याप्रकारे आदर, सन्मान व श्रद्धेने घेतले जाते त्याचप्रकारे सिंध प्रदेशातील वीर झुलेलाल यांचे नाव सन्मान आणि श्रद्धेने घेतले जाते.

गीतेतील ‘यदा यदाहि धर्मस्य...’ या श्लोकानुसार दमन आणि अत्याचाराची जेव्हा पराकाष्ठा झाल्याने जेव्हा सिंधमध्ये धर्मरक्षणार्थ पूज्य झुलेलाल यांनी अवतार घेतला तेव्हा नरातून नारायणच्या श्रेणीतले अमर पद त्यांना सहज मिळाले. पूज्य झुलेलाल यांनी मिरख बादशहाचे आपल्या नववी शक्ती व थल शक्तीद्वारे पतन केले होते. इतिहासात या गोष्टीचे अनेक उल्लेख आहेत की वीर झुलेलाल उडेरोलाल यांनी आपल्या नौसेनेने बादशहावर धास्ती प्रस्थापित केली होती. वीर उडेरोलाल यांचे एक वैशिष्ट्य हेसुद्धा आहे की त्यांनी मिर्ख बादशहाचा पराभव करूनसुद्धा त्याला जीवनदान दिले होते. आपल्या परम मानवीय व उदार दृष्टिकोनामुळे त्यांना जी कीर्ती व प्रसिद्धी मिळाली होती त्याचाच परिणाम आहे की साऱ्या सिंध प्रांतामध्ये वीर उडेरोलाल यांना देवत्वाचे महत्त्व प्राप्त झाले. तसेच ठिकठिकाणी अमरलाल यांचे मंदिर बांधण्यात आले जिथे हिंदू व मुस्लीम दोन्ही समाजाचे भाविक भक्तिभावाने पूजाअर्चा करू लागले. मिरख बादशहावर उडेरोलाल यांचा विजय अमानवी मूल्यांविरुद्ध दैवी व अधर्मावर धर्माचा विजय होता म्हणून दरवर्षी चैत्र महिन्यात पूज्य झुलेलाल यांचा जन्मदिवस मोठ्या आनंदोत्सवात साजरा केला जातो. जेव्हा उडेरोलाल यांनी मिरख बादशहावर आक्रमण केले होते तेव्हा त्यांनी हिंदूंना आदेश दिले होते की, आपल्याकडील सर्व शस्त्रे लपवून ठेवा व हातात फक्त दांडिया घेऊन नाचतगाजत चालण्यास सांगितले व वेळ आल्यावर आपल्याकडील शस्त्रे अचानक काढून मिरख याच्या सेनेवर आक्रमणासाठी सज्ज राहण्यास सांगितले. याच कारणाने लोकांना माहीत आहे किंवा नाही हिंदू सिंधी भक्त आजसुद्धा यादिवशी आपल्या हातात दांडिया घेऊन आपसात नाचतगाजत ढोल-ताशाच्या गजरात झुलेलाल यांच्या बहिराणासोबत मिरवणुकीत नाचतात. मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या गुढीपाडव्याने होते. त्याचवेळी सिंधीबांधव ‘चेट्रीचंड’ उत्सव साजरा करतात. सिंधमध्ये असताना सिंधीबांधव चेट्रीचंड हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करीत असत. फाळणी झाल्यानंतर आजतागायत चेट्रीचंड हा जन्मोत्सव सिंधीयत जो डिंहू म्हणून साजरा करतात.

मिरख बादशहाच्या अत्याचारापासून सुटका मिळण्यासाठी विद्वान पंडितांनी सिंधू नदीच्या किनारी एकत्र येऊन जलदेवतेची विधिवत पूजा करून प्रार्थना केली होती. सिंध सागराचा तट जणू महाकुंभाची पर्वणीच असावी, असे वाटत होते. अशा प्रकारे प्रार्थना, भजन करीत रात्र झाली, दुसरा दिवसही मावळला, अनेक आख्यायिकांप्रमाणे कोणी तीन, तर कोणी आठ दिवस सांगतात परंतु असे वाटते की, ती पूजा चाळीस दिवसांची असावी कारण यात सिंधीबांधव आजही चाळीस दिवसांचा उपवास ‘चालीहो’ म्हणून साजरा करतात व चालीहो उपवास ठेवणारे भाविक या काळात आपले केस कापत नाहीत, साबण व तेलाचा वापर वर्ज्य करतात तसेच लालसांई अमरलाल यांची प्रार्थना करीत चाळीस दिवस या काळात त्यांच्या मनात पूजेशिवाय कोणतेही विचार नसतात.

२५ वे अवतार म्हटल्या जाणाऱ्या दर्यालालचा जन्मदिन चैत्र शुद्ध द्वितीयेला सर्व दर्यास्थान दर्यालयात साजरा केला जातो. सिंधीबांधव त्यांची पूजा झुलेलालच्या रूपात करतात आणि मुस्लीमबांधव त्यांना जिंदहपीर म्हणून भजतात. याप्रमाणे उदेरोलाल दुलहदर्याशाह जिंदह पीर यांनी आपल्या भक्तांचे रक्षण केले व संवत १०२० च्या चतुर्दशीला लालसार्इंनी जलसमाधी घेतली. खरोखरच दरियालालच्या रूपात आपले अवतार कार्य पूर्ण करून लालउदयराज अमरलाल बनले. तेव्हापासून जगभरात वसलेले सिंधी समाजबांधव प्रत्येक वर्षी आपले इष्टदेव उदेरोचंद अमरलाल लालसांई अवतरण दिवस ‘चेट्रीचंड’ हा सिंधी नववर्ष धुमधडाक्यात मोठ्या उत्साहाने भक्तिमय वातावरणात साजरा करतात. सिंधी समाजबांधव आपले व्यवसाय संपूर्ण दिवस बंद ठेवून सारे एकत्र जमतात व बहिराणा साहेबची पूजा करतात. यावेळी एकमेकांना शुभेच्छा देऊन लहान मंडळी मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते व भक्तांसाठी महाप्रसाद केला जातो.

सायंकाळी पूज्य बहिराणा साहब पूज्य झुलेलाल यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येते. आयोलाल झुलेलालच्या गजरात दर्याशाहची ही मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करते. साºया जगात ‘लाल मेरी पत रखियो भला झुलेलालण’, ‘लाल झुलेलाल’ आदी धार्मिक गाण्यांवर भाविक भक्तिभावाने नाचतात. लालसांर्इंच्या मिरवणुकीत उदेरोलाल यांची भव्य मूर्ती असते. लालसांई व अन्य देवी-देवतांची वेशभूषा धारण केलेले देखावे असतात. नदीकिनारी झुलेलालची आराधना गीते ‘पंजडा’ गातात आणि ‘अख्खा’ तांदूळ, साखर नदीत अर्पण करून सर्वधर्मीय समाजाच्या शांतता, समृद्धीसाठी प्रार्थना करीत बहिराणा साहबचे श्रद्धेने विसर्जन करतात. हा सण शेती उत्सवापैकी एक आहे. विसर्जनानंतर ‘सेसा’ प्रसाद वाटण्यात येतो व एकत्रित भक्तगण प्रीतिभोजन करतात. खाद्यपदार्थांमध्ये विशेष ‘ताहिरी’ गोडभात व ‘साईभाजी’ पालक व चनाडाळ यांचा समावेश असतो. गेल्या काही दशकांपासून या दिवसाला सिंधी दिवस म्हणून संबोधले जाते.

- महेशभाई गिरधारीलाल लखवाणी, जेलरोड, नाशिकरोड 

 

टॅग्स :NashikनाशिकSindhi Campसिंधी कॅम्पHinduहिंदूReligious Placesधार्मिक स्थळे