नाशिक : दुष्काळग्रस्त शेतकरी व आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या ‘नाम’ या संस्थेला नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नुकताच सव्वा लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला. नाम फाउंडेशनच्या वतीने कर्जबाजारी शेतकरी व आत्महत्त्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्यासाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली आहे. या संस्थेला व पर्यायाने शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजयकुमार हळदे, सचिव संदीप दराडे, संचालक गोटीराम खैरनार, पंडित कट्यारे, मधुकर आढाव संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. (प्रतिनिधी)
कर्मचारी पतसंस्थेतर्फे ‘नाम’ला धनादेश
By admin | Updated: December 7, 2015 23:01 IST