शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

लासलगावचे कवी प्रकाश होळकरांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 20:52 IST

महिलेविरूद्ध गुन्हा दाखल : ‘कोरडे नक्षत्र’ काव्यसंग्रहाच्या नकली प्रतींची छपाई

ठळक मुद्दे सविता पन्हाळे नामक महिलेविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल काव्यसंग्रहाच्या सुमारे २ हजार नकली प्रती छापून त्या राज्यभर वितरित करत बदनामी केल्याची तक्रार

नाशिक - ‘कोरडे नक्षत्र’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून साहित्यप्रांतात परिचित असलेले लासलगाव येथील कवी आणि चित्रपट गीतकार प्रकाश होळकर यांच्या काव्यसंग्रहाच्या नकली प्रतींची छपाई करत पॉप्युलर प्रकाशनासह होळकर यांची फसवणूक करणाऱ्या सविता पन्हाळे नामक महिलेविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर महिलेने प्रकाश होळकरांची पत्नी असल्याचा बनाव रचत ‘कोरडे नक्षत्र’ या काव्यसंग्रहाच्या सुमारे २ हजार नकली प्रती छापून त्या राज्यभर वितरित करत बदनामी केल्याची तक्रारही होळकर यांनी फिर्यादित केली आहे.सातपूर पोलिस ठाण्यात प्रकाश होळकर यांनी फसवणुकीसंबंधी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादित म्हटले आहे, ‘कोरडे नक्षत्र’ हा काव्यसंग्रह १९९७ साली पॉप्युलर प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क पॉप्युलर प्रकाशनाला दिले आहेत. या काव्यसंग्रहाला आतापर्यंत अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय, अनेक मराठी चित्रपटांतही त्यातील कवितांचा समावेश झालेला आहे. या काव्यसंग्रहाची द्वितीय आवृत्ती २००५ मध्ये प्रकाशित करण्यात आली आणि तिची किंमत ६० रुपये आहे. परंतु, सदर काव्यसंग्रहाच्या नकली प्रतींची छपाई केल्याचे निदर्शनास आले. या नकली प्रती छापताना पुस्तकाचे मुखपृष्ठ बदलण्यात आले. प्रकाशक म्हणून अरूनिमा प्रकाशन असा उल्लेख करण्यात आला तर प्रकाशिका म्हणून सौ. मंदाकिनी प्रभाकर पन्हाळे असे नाव छापण्यात आले आहे. पुस्तकाची किंमत १०० रुपये ठेवण्यात आली आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकूर व ज्ञात नसलेला फोटो छापण्यात आला आहे. सातपूर मधील एका प्रिटींग प्रेसमधून सदर नकली पुस्तकांची छपाई करण्यात आली. सदर कृत्य हे सविता पन्हाळे या महिलेने केल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकाशक म्हणून उल्लेख केलेल्या तिच्या आईला फोनवरून विचारणा केली असता त्यांनी या सा-या प्रकाराबाबत अनभिज्ञता दर्शविली. सविता पन्हाळे ही महिला एलआयसीमध्ये सेवेत असून तिने ‘कोरडे नक्षत्र’ची नक्कल करत त्याच्या २००० प्रती छापत फसवणूक केली आहे. सदर महिला ही राज्यातील नामवंत साहित्यिकांना सदर प्रती भेट म्हणून पाठवत असल्याचेही होळकर यांनी फिर्यादित नमूद केले आहे. होळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सातपूर पोलिसांनी सविता पन्हाळे या महिलेविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.रात्री अपरात्री फोन करुन त्रासहोळकर यांनी फिर्यादित म्हटले आहे, सदर महिला ही गेल्या काही वर्षांपासून रात्री-अपरात्री फोन करत, एसएमएस पाठवत प्रचंड त्रास देत आहे. शिवाय, माझ्या पत्नीलाही तिने फोनवरून त्रास दिलेला आहे. सदर महिलेविरुद्ध लासलगाव पोलिस ठाणे, एलआयसी कार्यालय, महिला आयोग यांच्याकडेही तक्रारी केल्या आहेत परंतु सदर महिला चौकशीसाठी कुठेही हजर झालेली नाही. आपल्याशी लग्न झाल्याचाही ती बनाव रचत राज्यभर आपली बदनामी करत आहे, असेही होळकरांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे सदर महिलेने काव्यसंग्रहाच्या नकली प्रती छापताना त्यात प्रकाशक म्हणून आईची परवानगी न घेता तिचे नाव टाकत आईचीही फसवणूक केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक