शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:58 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ व ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनांच्या नावाखाली नाशिक जिल्ह्यात काही बोगस संस्था आणि व्यक्ती घरोघरी जाऊन नोंदणीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने केंद्र किंवा राज्य शासनाकडून कोणतीही नोंदणी केली जात नसल्याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाने दिले आहे.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ व ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनांच्या नावाखाली नाशिक जिल्ह्यात काही बोगस संस्था आणि व्यक्ती घरोघरी जाऊन नोंदणीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने केंद्र किंवा राज्य शासनाकडून कोणतीही नोंदणी केली जात नसल्याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाने दिले आहे.महिला आणि बालिका सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य  शासनाच्या अनेक योजना प्रकल्प अधिकारी तसेच महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविल्या जातात. ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ व ‘माझी कन्या भाग्यश्री’ या आर्थिक लाभाच्या योजना सध्या सुरू आहेत. भाग्यश्री कन्या योजनेसाठी ५० आणि २५ हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट केले जाते तर बेटी पढाओ योजनेत शिक्षण आणि लग्नापर्यंत मुलींना आर्थिक लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने यासाठी शंभर करोडचे बजेट आखले आहे.  बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेतून गरीब कुटुंबातील मुलींना दोन लाख रुपये रोख मिळणार असल्याचे सांगून नाशिक जिल्ह्णातील ग्रामीण भाग तसेच झोपटपट्टी परिसरात घरोघरी जाऊन अर्ज भरून घेण्यात आले आहेत. सदर अर्ज भरून घेण्यासाठी शंभर ते दोनशे रुपये शुल्क आकारण्यात आलेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्णातील अनेक गावे तसेच शहरालगत असलेल्या झोपडपट्टी भागातून लाखो रुपये शुल्क गोळा करण्यात आले आहेत. शहर, जिल्ह्णात अशाप्रकारे खोटे नोंदणीचे अर्ज भरून घेतले जात असताना नाशिकमधील जिल्हा यंत्रणेला मात्र याबाबतची कोणतीही माहिती नव्हती. लाखो रुपयांच्या आमिषाने गाव, खेडे आणि झोपडपट्टीतील महिला शंभर, दोनशे रुपये सहज काढून देत असल्यामुळे कथित एनजीओ आणि त्यांच्या प्रतिनिधींनी नाशिक जिल्ह्णातून लाखो रुपये गोळा केल्याचा अंदाज आहे. दिल्लीतील भाजपाच्या काही नेत्यांना सदर बाब कळल्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये याबाबतची विचारणा केली असता जिल्हा परिषद तसेच प्रकल्प विभागाकडून अशी कोणत्याही प्रकारे नोंदणी केली जात नसून बनावट एनजीओकडून असे प्रकार सुरू असल्याचे समोर आले. याबाबतची चौकशी दिल्लीतून होण्याची शक्यता असल्याने या प्रकारामुळे जिल्हा यंत्रणा चांगलीच हादरली आहे.दिल्ली भाजपाकडून नाशिकला विचारणानाशिक जिल्ह्णात ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ व ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनांच्या नावाखाली बनावट एनजीओ नोंदणी शुल्क आकारून नोंदणी करीत असल्याची बाब दिल्लीतील भाजपा नेत्यांना कळल्यानंतर त्यांनी नाशिकमधील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबतची चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी चौकशी केली असता येथील कोणत्याही शासकीय विभागामार्फत अशाप्रकारची नोंदणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फसवणुकीचा प्रकार उघड झाला. यापूर्वी दिल्लीत अशाच प्रकारे फसवणुकीचा प्रकार समोर आला होता.शासनाकडून नियुक्तीच नाहीकेंद्र आणि राज्य शासनाच्या कोणत्याही विभागाने या योजनांची माहिती जमा करणे तसेच नोंदणी करणे यासाठी व्यक्ती अथवा संस्थांची निवड केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारे माहिती जमा करणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येऊ नये. तसेच अशी व्यक्ती आढळल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.- दत्तात्रय मुंडे, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद 

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद