देवळा : तालुक्यातील कापशी सोसायटीच्या सभापतिपदी सुरेश श्रीधर भदाणे यांची, तर उपसभापतिपदी गणेश दादाजी पाचपिंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कापशी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली. त्यावेळी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील प्रकाश भदाणे, चिंतामण भदाणे, संतोष भदाणे, जगन भदाणे आदिंनी परिश्रम घेऊन गावातील शांतता अबाधित ठेवत निवडणूक बिनविरोध केली होती. परंतु भटक्या विमुक्त जाती ह्या जागेसाठी एकही नामांकनपत्र दाखल न झाल्याने ती जागा रिक्त राहिली. यानंतर सर्वांचे लक्ष चेअरमन, व्हाइस चेअरमनच्या निवडीकडे लागले होते. निवडणूक निर्णय अधिकारी एन. आर. वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कार्यालयात हा निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. कडू भदाणे यांनी चेअरमनपदासाठी सुरेश भदाणे व व्हाइस चेअरमन पदासाठी गणेश पाचपिंड यांनी आपले अर्ज दाखल केले. इतर कोणाचाही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी भास्कर भदाणे, कडू भदाणे, नारायण भदाणे, यादव भदाणे, रवींद्र भदाणे, शांताराम भदाणे, हिरामण भदाणे, नामदेव भदाणे, सुमनबाई भदाणे, वत्सलाबाई भदाणे आदि संचालकांसह सचिव साहेबराव पवार उपस्थित होते. (वार्ताहर)
कापशी सोसायटीवर भदाणे, पाचपिंड यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 22:53 IST