शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चटर्जी पिता-पुत्राचे तबलावादन

By admin | Updated: December 17, 2015 00:29 IST

संगीत समारोह : अविराज तायडे यांच्या सुरावटीला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद

नाशिक : धा धिन् धिन् धा असा तीन तालाचा ठेका धरत कोलकात्याचे प्रसिद्ध तबलावादक पं.अनिंदो चटर्जी आणि त्यांचे चिरंजीव अनब्रुत चटर्जी यांनी पं. भानुदास पवार स्मृती संगीत समारोह कार्यक्रमात तबलावादनाचे सादरीकरण केले. बुधवारी (दि.१६) महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या या संगीत समारोह कार्यक्रमात यानंतर चटर्जी यांनी दिल्ली, पंजाब घराण्यातील कायदे सादर करत उपस्थित कलाकारांची दाद मिळवली.एसडब्ल्युएस संस्था आणि पवार तबला अकादमी, नाशिक यांच्यातर्फे या संगीत समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर फारूखाबाद घराण्यातील चटर्जी यांनी आपल्या नादमय आणि ओघवत्या शैलीत श्रवणीय तबलावादनाचा अनुभव रसिकांना दिला. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत असताना अनोखी लग्गी पेश करत चटर्जी यांनी ही मैफल अधिकच खुलवली. यानंतर गद्दे, टुकडे आणि चलन यांचे सादरीकरण करण्यात आले. अनिंदो चटर्जी आणि अनब्रुत चटर्जी यांना फारूख लतिफ (सारंगी), प्रशांत महाबळ (संवादिनी) यांनी साथ संगत केली.सुरुवातीला गायक अविराज तायडे यांचे गायन सादर करण्यात आले. आपल्या गायनाची सुरुवात तायडे यांनी यमन रागातील ‘मेरा मन बांध लीनो’ ही विलंबित तालातली बंदिश सादर केली. अविराज तायडे यांना नितीन पवार (तबला), सुभाष दसककर (संवादिनी) आशिष रानडे, ज्ञानेश्वर कासार आणि आरोह ओक यांनी तानपुऱ्यावर स्वरसाथ केली. पं.भानुदास पवार स्मृती संगीत समारोह कार्यक्रमाला दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. यावेळी एस.टी.पाटील, एसडब्ल्युओचे अध्यक्ष रघुवीर अधिकारी, दीपक कुलकर्णी, मनीषा अधिकारी, नितीन पवार, अविराज तायडे उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोरी किणीकर यांनी केले.