शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारीसाठी आदिवासींना ‘चटके’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:30 IST

वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागात रोजगाराचा प्रश्न बिकट झाला असून, शेती व शेतीपूरक जोडधंदेही मंदावल्याने आदिवासींची शहरी भागासह जवळील खेड्यांच्या दिशेने भटकंती वाढत आहे. नाशिकपासून अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल्या गिरणारे गावातील मजुरांच्या नाक्यावर आदिवासींचा वाढता ठिय्या त्याचे बोलके उदाहरण ठरत आहे.

गिरणारे : वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागात रोजगाराचा प्रश्न बिकट झाला असून, शेती व शेतीपूरक जोडधंदेही मंदावल्याने आदिवासींची शहरी भागासह जवळील खेड्यांच्या दिशेने भटकंती वाढत आहे. नाशिकपासून अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल्या गिरणारे गावातील मजुरांच्या नाक्यावर आदिवासींचा वाढता ठिय्या त्याचे बोलके उदाहरण ठरत आहे. पावसाळ्याची चार महिनेजिल्ह्यातील आदिवासी भाग जणू नंदनवनासारखाच भासतो. सर्वत्र भात, नागली, खुरसणी, भुईमूग यांसारख्या पिकांचे उत्पादन जोरात घेतले जाते. त्यामुळे स्थलांतराचा प्रश्न निर्माण होत नाही. आदिवासींच्या हाताला कामही मिळते आणि उत्पादनाचे प्रमाणही वाढलेले असते. पाणी टंचाईची समस्याही सुटलेली असते. त्यामुळे आदिवासी लोक पावसाळ्यात उंबरा ओलांडत नाही; मात्र उन्हाळ्यात परिस्थिती याउलट होते. पोटापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासींना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधासाठी शहराजवळची खेडीची वाट धरावी लागते. परिणामी गिरणारेसारख्या भागात आदिवासींचे स्थलांतर होऊ लागले आहे. गिरणारे गाव शहर व आदिवासी भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काश्यपी धरणाचा परिसर असलेल्या गिरणारे गाव तसे कृषिसमृद्ध आहे. गिरणारे गाव आदिवासी गाव, पाड्यांपासून जसे तासाभराच्या अंतरावर आहे, तसे या गावातून नाशिक शहरात येण्यासाठी महामंडळाची बससेवेसह खासगी वाहतूक सेवाही उपलब्ध असल्यामुळे शहरासोबत हे गाव जोडलेले आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. गिरणारे शिवाराला द्राक्ष बागायती शेती लाभलेली आहे. यामुळे या भागात द्राक्ष उत्पादकांची संख्या आहे. तसेच द्राक्ष काढणीनंतर मणुका तयार करणारे विविध व्यावसायिकांचाही येथे मुक्का दिसून येतो. यामुळे या भागात मजुरांची नेहमीच गरज भासते. काबाडकष्टाची कामे करण्यासाठी आदिवासी भागातील लोकांची मोठी मदत होते. एकूणच मजुरीसाठी गिरणारे भागात सध्या आदिवासींचा राबता दिसून येत आहे.उदासीनतेची ‘मनरेगा’आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे. दुर्गम आदिवासी गाव, पाड्यांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) विविध विकासकामे राबविली जातात; मात्र तरीदेखील तुटपुंजे मजुरी, अल्प विकासकामांमुळे ‘मनरेगा’मध्ये आदिवासींचे फारसे ‘मन’ रमत नाही. नाईलाजास्तव भटकंतीची वेळ ओढावते. त्यातच सरकारी अनास्थेचेही भर पडते. कारण अनास्थेमुळे विकासकामांना प्रत्यक्ष ‘मुहूर्त’ मिळण्यास विलंब होतो. परिणामी आदिवासींना ‘मनरेगा’मध्ये हाताला काम कमी प्रतीक्षा अधिक करावी लागते.

टॅग्स :Employeeकर्मचारी