शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चिचोंडीत मशाल मिरवणूक

By admin | Updated: February 22, 2017 23:51 IST

येवला : शिवयोद्धा सेवाभावी मंडळाचा उपक्र म

येवला: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिचोंडी बुद्रुक (ता. येवला) येथील शिवयोद्धा सेवाभावी मंडळाने रायगडहून पायी आणलेल्या मशालीची व शिवाजी महाराज पुतळ्याची गावातून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षी रायगडहून पायी मशाल आणून येथील शिवप्रेमी युवक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतात. हे युवक छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत चिचोंडी बुद्रुक गावात पोहोचले. गावात ठिकठिकाणी महिलांनी मशालीचे पूजन केले. येथील मंदिरापुढे गावातील ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या युवकांनी रायगडावर स्वच्छता अभियान राबवून ऐतिहासिक वस्तू व किल्ल्याप्रती संवर्धन खूप महत्त्वाचे असल्याचा संदेश दिला. सात दिवस पायी प्रवास करून हे युवक सलग तिसऱ्या वर्षी मशाल गावात घेऊन आल्याने मोठा उत्साह गावात दिसून आला. यावर्षी शिवचरित्रावर गोरख महाराज कुदळ यांचे व्याख्यान व महाप्रसाद आयोजित केला.  मशाल यात्रेत ग्रुपचे सदस्य रावसाहेब मढवई, गोडीराम मढवई, गणेश गोसावी, अनिल मढवई, पुंडलिक शिंदे, समाधान सूर्यवंशी, रवींद्र मढवई, कृष्णा डांगे, संतोष मढवई, संतोष भोरकडे, भाऊसाहेब मढवई, शुभम मढवई, अंतू कुटे, रंभाजी कुटे, औदुंबर मढवई, शरद पवार, दादा लभडे, विक्र म रोठे आदिंसह युवक या मशाल यात्रेत सहभागी झाले होते. तर मनोज गायकवाड, सुनील खराटे, गोरख पगारे आदिंसह सर्व जातिधर्माचे युवक या उत्सवात सहभागी झाले होते. मशाल गावात पोहोचताच सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, नामदेव मढवाई, प्रभाकर सूर्यवंशी, सोमोदय मढवई, सुखदेव मढवाई, रघुनाना घोटेकर, नंदू घोटेकर आदिंसह ग्रामस्थांनी स्वागत केले. रात्री कीर्तनास गर्दी झाली. महाप्रसादाने सांगता झाली.