शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

हत्येचा आरोपी बनवतोय आकर्षक गणेश मूर्ती!

By admin | Updated: August 3, 2014 23:02 IST

खुनासारख्या गंभीर गुन्ह्यासाठी मोर्शीतील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संजय खडसे हा कलावंत सध्या दुर्गादेवी व गणपतीच्या मूर्ती घडविण्यात व्यस्त आहे. कारागृह प्रशासनाकडून मिळणाऱ्या

 

येवला : शहरापासून मनमाडकडे बारा कि.मी. अंतरावर असणाऱ्या तांदूळवाडी फाट्याजवळ व्हॅन व टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात चार वर्षीय मुलासह सहा युवक ठार झाले. सदरची घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. मारुती व्हॅनमधून (क्र. जीजे १८ एएस २९०१) मध्य प्रदेशातील नऊ भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येत होते. सदरची व्हॅन तांदूळवाडी फाट्याजवळ हॉटेल मेवाडनजीक आली असता याचदरम्यान मनमाडच्या दिशेने निघालेला आयशर टेम्पो (क्र. एमपी ४६ जी ०७५३) यांच्यात जोरदार समोरासमोर धडक झाली. परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊसही सुरू होता. भीषण अपघातामध्ये व्हॅनमधील पाच प्रवासी जागीच ठार झाले, तर अन्य चौघांना येवला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना केले होते. मात्र, रस्त्यातच चौघांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील मयतांपैकी चार जण मध्य प्रदेशातील डेहार (ता. कोकसे, जि. धार) येथील आहेत. त्यांची नावे अशी: जितेंद्र हनसिंग बगेर (२३), चेतन रमेश सिसोदिया (२१), शैलेंद्र पंकज बगेर (४), अनिल महेंद्र पटेल (२०), रवींद्र रणजितसिंग चव्हाण (३०, रा. गुडगु, ता. अली, जि. राजापूर, मध्य प्रदेश) आणि अनिल महेंद्र पटेल (१९) यांचा समावेश आहे. राहुल नानसी बामनिया (२२, रा. मानवतनगर, इंदूर) याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे, तर अनिल चंद्रसिंग किराडे (२०, रा. डेहार, ता. कोकसे, जि. धार) याच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. पंकज नारायण बगेर (२५) याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी आयशर चालक सचिन भगिरथ कुशवाह, रा. बडवानी यास ताब्यात घेण्यात आले.(पान ८ वर)सकाळी सहा वाजता झालेल्या भीषण धडकेच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. संभाजी पवार यांनी स्वत:चा जेसीबी आणून पांडुरंग शिंदे, विलास काटे व ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना व मृतांना बाहेर काढले. पोलीस निरीक्षक राम भालसिंग, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश निकम, हवालदार शिरूड यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक संजय मोहिते, अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस उपअधीक्षक मनमाड विभाग नरेश मेघराजानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तालुका पोलिसांनी जखमींजवळील कागदपत्रांनुसार दूरध्वनीवरून अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांना माहिती दिली. येवला ग्रामीण रुग्णालयात मयतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्तांचे नातेवाइक येवला येथे येणार आहे. (वार्ताहर) सकाळी सहा वाजता झालेल्या भीषण धडकेच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. संभाजी पवार यांनी स्वत:चा जेसीबी आणून पांडुरंग शिंदे, विलास काटे व ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना व मृतांना बाहेर काढले. पोलीस निरीक्षक राम भालसिंग, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश निकम, हवालदार शिरूड यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपअधीक्षक संजय मोहिते, अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस उपअधीक्षक मनमाड विभाग नरेश मेघराजानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तालुका पोलिसांनी जखमींजवळील कागदपत्रांनुसार दूरध्वनीवरून अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांना माहिती दिली. येवला ग्रामीण रुग्णालयात मयतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्तांचे नातेवाइक येवला येथे येणार आहे. (वार्ताहर)