शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

धर्मादाय संस्थांचा ‘धर्मादायी’ कारभार कागदोपत्री

By admin | Updated: February 16, 2017 23:17 IST

अनियमितता : महिनाभरात १७१५ संस्थांचे दावे निकाली

विजय मोरे नाशिकजनतेची धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या राज्यातील ७ लाख ४२ हजार ५७० विश्वस्त संस्थांपैकी सुमारे ८० टक्के संस्था या केवळ कागदोपत्री अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे़ नाशिक विभागातील ५३ हजार विश्वस्त संस्थांपैकी केवळ दहा टक्केच संस्थांचा कारभार सुव्यवस्थितपणे सुरू असून, त्या कायदेशीररीत्या परिपूर्ण, तर उर्वरित ९० टक्के विश्वस्त संस्था केवळ कागदोपत्री आहेत़ राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू केलेल्या मोहिमेकडेही संस्थांनी पाठ फिरविली असून, त्यांनी आपला धर्मादाय कारभार सुरूच ठेवल्याचे चित्र आहे़केवळ कागदोपत्री धर्मादाय तसेच सेवाभावी संस्थांची नोंदणी रद्द करण्याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली होती़ याबाबत आदेश लागू होण्यापूर्वी संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी एक संधी देण्याच्या उद्देशाने राज्याचे धर्मादाय आयुक्त श़ भा़ सावळे यांनी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत विशेष मोहीम सुरू केली आहे़ या मोहिमेचा लाभ जानेवारी महिन्यात विभागातील एक हजार ७१५ संस्थांनी घेतला असला तरी विभागातील सेवाभावी संस्थांची संख्या लक्षात घेता ही संस्था अत्यल्प असल्याचे दिसून येते़‘विश्वासातून विकास’ हे ब्रीद, तर शैक्षणिक प्रचार, रुग्णसेवा व सामाजिक एकता ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून धर्मादाय संस्थांचे कार्य अपेक्षित आहे़ नाशिक विभागातील धर्मादाय संस्थांचा विचार करता सुमारे ९० टक्के धर्मादाय संस्थांनी गत अनेक वर्षांपासून लेखापरीक्षण, बदल अर्ज वा कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली नसून त्या अनियमित व बेकायदेशीर ठरणार आहेत़ यापैकी अनेक संस्थांनी तर मोठ्या प्रमाणात शासकीय योजना राबवूनही धर्मादाय आयुक्तांकडे अहवालच सादर केलेला नाही़ आजमितीस नोंदणी केलेल्या संस्थांमध्ये अनियमित संस्थांची संख्या निम्म्याहून अधिक आहे़