नाशिकरोड : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अग्निशामक दलाच्या ना हरकत दाखल्यासाठी प्रतिदिन पाचशे रुपयांप्रमाणे शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा विभागीय अधिकाºयांना व जाचक परवानगीबाबत धारेवर धरले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी मनपाने जाचक अटी लावल्या आहेत. मंडप, वाद्य, शुल्कासोबत मनपा अग्निशामक विभागाने त्यांच्या ना हरकत दाखल्यासाठी प्रतिदिन ५०० रुपयांप्रमाणे शुल्क भरण्याचा नियम केला होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये (दि. ३०) वृत्त प्रसिद्ध झाले होते. गणेशोत्सव मंडळाच्या परवानगीच्या जाचक अटी, शुल्क आदी कारणांवरून नाशिकरोड शिवसेना शाखेच्या पदाधिकाºयांनी शुक्रवारी दुपारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना घेराव घालून जाचक अटी, शुल्क, समन्वयाच्या अभावामुळे होणारा त्रास, अग्निशामक परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करावी यावरून चांगलेच धारेवर धरले. निवेदनावर उपमहानगरप्रमुख नितीन चिडे, विभागप्रमुख योगेश देशमुख, किरण डहाळे, श्याम खोले, सुनील देवकर, नितीन खर्जुल, राजेंद्र जाचक, मसुद जिलानी, स्वप्नील औटे, विकास गिते, चंदु महानुभाव, राजेश फोकणे, सागर निकाळे, विकास ढकोलिया आदींच्या सह्या आहेत.
गणेश मंडळांना शुल्क आकारणी; अधिकाऱ्यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:19 IST