शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

महापालिकेत महत्त्वाची खाती प्रभारींच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:31 IST

महापालिकेत पुरेसे मनुष्यबळ असल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे एकीकडे करत असले तरी, सद्यस्थितीत अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्यांची वानवा भासत आहे. पालिकेत महत्त्वाची खाती ही प्रभारींच्या हाती सोपविण्यात आलेली आहेत.

नाशिक : महापालिकेत पुरेसे मनुष्यबळ असल्याचा दावा आयुक्त तुकाराम मुंढे एकीकडे करत असले तरी, सद्यस्थितीत अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्यांची वानवा भासत आहे. पालिकेत महत्त्वाची खाती ही प्रभारींच्या हाती सोपविण्यात आलेली आहेत. त्यामुळे आयुक्तांनी सुमारे १४ अधिकाºयांची प्रतिनियुक्तीवर मागणी शासनाकडे केली आहे. परंतु, शासनाची एकूणच भूमिका लक्षात घेता महापालिकेला अधिकारी मिळणे अवघड मानले जात आहे.  महापालिकेत ७०९० पदे मंजूर आहेत. त्यातील सुमारे १७०० पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्चाचा डोलारा वाढत असल्याने शासनाकडून नोकरभरतीला मनाई आहे. त्यात दरमहा सेवानिवृत्त होणाºया कर्मचाºयांची संख्या वाढत चालली आहे. सन २०१६ मध्ये महापालिकेतून १११ कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर सन २०१७ मध्ये ती संख्या १३३ इतकी होती. सन २०१८ मध्ये तब्बल १४५ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. सन २०१९ मध्ये तर अनेक महत्त्वाच्या पदांवरील अधिकाºयांसह बव्हंशी कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला मोठ्या प्रमाणावर कुशल व अनुभवी कर्मचाºयांची आवश्यकता भासणार आहे. गेल्या वर्षी १३३ कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना दोन वैद्यकीय अधिकाºयांनी राजीनामे दिले शिवाय, शहर अभियंता सुनील खुने, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बनकर, भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता गौतम पगारे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एम. गायकवाड, कार्यकारी अभियंता एस. वाय. पवार आणि विधी विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग चोखाळला. चार दिवसांपूर्वी शहर अभियंता उत्तम पवार हे निवृत्त झाले. सद्यस्थितीत, महापालिकेत उद्यान अधीक्षक, आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, उपआयुक्त प्रशासन, शहर अभियंता आदी महत्त्वाची पदे प्रभारींच्या हाती आहेत. त्यात, मुख्य लेखापरीक्षकांकडे प्रशासनाचा अतिरिक्त कारभार असल्याने त्यांची तारांबळ उडताना दिसते, तर आरोग्य व वैद्यकीय या दोन महत्त्वाच्या खात्यांवर प्रभारी नेमणुका आहेत. कर विभागाची जबाबदारी सांभाळणारे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांचाही कालावधी संपुष्टात आलेला आहे, तर नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागुल यांचा कालावधी जूनमध्ये संपुष्टात येईल. महापालिकेत कर्मचारीवर्ग पुरेसा आहे परंतु, अधिकारीवर्गाची वानवा आहे, हे वास्तव आयुक्तांनीही मान्य केले आहे. त्यानुसार, त्यांनी शासनाकडे अधिकाºयांची मागणी केलेली आहे.शहर अभियंताही प्रतिनियुक्तीवर?शहर अभियंता उत्तम पवार हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे शहर अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार भुयारी गटार योजनेचे कार्यकारी अभियंता संजय घुगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार सदर कार्यभार पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांच्याकडे येणे अपेक्षित होते. परंतु, चव्हाणके यांच्याकडे असलेली महत्त्वाची जबाबदारी लक्षात घेऊन आयुक्तांनी घुगेंची निवड केल्याचे समजते. मात्र, आयुक्तांनी शहर अभियंता पदासाठीही शासनाकडे प्रतिनियुक्तीवर अधिकाºयाची मागणी केली आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शहर अभियंता या महत्त्वाच्या पदावर बाहेरचा अधिकारी नियुक्त होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका