शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

उत्तम व्यावसायिक शिक्षणानेच चारित्र्य, राष्ट्रनिर्माण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:55 IST

शिक्षणाने समाजाला नवदृष्टी मिळते. शिक्षणाचा प्रचंड विस्तार झाला आहे. विद्यापीठे, महाविद्यालांची संख्या वाढली. मात्र काळानुरूप शिक्षणामध्ये बदलही अपेक्षित आहेत.

नाशिक : शिक्षणाने समाजाला नवदृष्टी मिळते. शिक्षणाचा प्रचंड विस्तार झाला आहे. विद्यापीठे, महाविद्यालांची संख्या वाढली. मात्र काळानुरूप शिक्षणामध्ये बदलही अपेक्षित आहेत. शिक्षणाने सुसंस्कृत समाजाची निर्मिती व्हावी, व्यक्तीचे चारित्र्य निर्माण आणि त्यातून चांगल्या राष्ट्राची निर्मिती करणाऱ्या शिक्षणानेच देशाचा विकास, प्रगती शक्य असल्याचा सूर परिसंवादत उमटला.  कॉलेजरोेड, गंगापूररोड वाणी मित्रमंडळातर्फे रावसाहेब थोरात सभागृहात ‘शिक्षणविश्व-२०१८’ शैक्षणिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या सुरुवातीला शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसवी यांनी शिक्षणाने उद्योजकता वाढल्याचे सांगत शिक्षणातील स्थित्यंतरे आणि शैक्षणिक संस्थांचा विकास यावर प्रकाश टाकला. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मळलेल्या वाटा सोडून आपला कल, आवड ओळखून शिक्षण घ्यावे, असे सांगत सवयीतून कार्य संस्कृती आणि चरित्र निर्माण होते, असे सांगितले. त्यासाठी तरु णाईने चांगल्या सवयी जीवनशैली कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. जीएसटी आयुक्त उन्मेष वाघ यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यापूर्वी चांगला सल्ला घ्यावा. त्यासाठी शिक्षणतज्ज्ञ, गुगल आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. यश हमखास मिळते, असे सांगितले.  दरम्यान, वेदांत देव याने शालांत परीक्षेत आणि अनुजा टिपरे हिने १२ वीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवराच्या हस्ते सत्कार त्यांचा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने चर्चासत्राला प्रारंभ झाला. सूत्रसंचलन मधुरा क्षेमकल्याणी यांनी केले. प्रशांत मोराणकर यांनी आभार मानले. याप्रसंगी योगेश मालपुरे, नितीन दहिवेलकर, सरचिटणीस संजय दुसे, उपाध्यक्ष योगेश राणे, संजय बागड, चिटणीस राजेंद्र कोठावदे, खजिनदार हर्षद चिंचोरे, हितेश देव, अ‍ॅड. देवदत्त जायखेडकर, महेश पितृभक्त, प्रवीण अमृतकर, पवन बागड, अमोल शेंडे, भगवंत येवला आदी उपस्थित होते.ऊर्जेचा विकास तरु णाईने केला पाहिजेशिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स गोसावी, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, बडोदा विभागाचे जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आय.आर.एस. उन्मेश वाघ व प्रेरणादायी व्याख्याते दिलीपकुमार औटी यांनी शिक्षणाची सद्यस्थिती त्यातील स्थित्यंतरे यावर मत मांडले.‘लाइफ कोच’ दिलीप औटी यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करायचे तर शिक्षणाला पर्याय नाही, असे सांगत त्यासाठी सर्जनशीलता, ऊर्जेचा विकास तरु णाईने केला पाहिजे, असा सल्ला दिला.

टॅग्स :Nashikनाशिक