शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वामनदादांच्या नावे औरंगाबाद विद्यापीठात अध्यासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:50 IST

महाराष्टतील विद्यापीठांमध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावे अध्यासन व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नाशिक- मधील मुक्त विद्यापीठा- नंतर आता औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वामनदादांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात आले असून, या अध्यासनाच्या माध्यमातून त्यांच्या समग्र साहित्यावर संशोधन केले जाणार आहे.

नाशिक : महाराष्टतील विद्यापीठांमध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावे अध्यासन व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नाशिक- मधील मुक्त विद्यापीठा- नंतर आता औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वामनदादांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात आले असून, या अध्यासनाच्या माध्यमातून त्यांच्या समग्र साहित्यावर संशोधन केले जाणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ लोकगीतांच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे तसेच समाजामध्ये स्वाभिमान आणि गावागावात चळवळीची ऊर्जा टिकविण्याचे काम वामनदादांनी आपल्या लोकगीतांच्या माध्यमातून केलेले आहे. याशिवाय डॉ. आंबेडकरांनी संविधानात सांगितलेला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दिलेले योगदान, सुमारे दहा हजार लिहिलेली लोकगीते, गझल, कव्वाली, काव्यसंग्रह आणि आत्मचरित्र क्रमिक पुस्तकांच्या माध्यमातून जनतेसमोर यावे यासाठी गेल्या १४ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत.वामनदादांचे साहित्य अभ्यासक्रम आणि संशोधनाच्या पातळीवर नेण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा यासाठी येवला येथील वामनदादा कर्डक प्रतिष्ठान आणि औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहे.वामनदादांच्या साहित्यावर संशेधन करून समग्र चरित्र उभे केले जाणार आहेच शिवाय त्यांची साहित्य परंपरा जतन करण्याचाही उपक्रम अध्यासनाच्या माध्यमातून राबविला जाईल. शाहिरी जलशाला नवसंजीवनी देण्यासाठीचे प्रशिक्षण, संशोधन अध्यासनाकडून केले जाणार आहे.- प्रा. युवराज धबाडगे, संचालक, लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र, औरंगाबादवामनदादा कर्डक यांचा सुमारे १० हजार गीतांचा खजिना आहे. अभ्यासक्रमात विषय आला तरच त्यावर अभ्यास होऊ शकले आणि त्यातून वामनदादांचे साहित्य जगासमोर येईल. त्यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.- प्रा. शरद शेजवळ, संस्थापक कार्याध्यक्ष, लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक

टॅग्स :universityविद्यापीठNashikनाशिक