नाशिक : सार्वत्रिक श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे अधिसूचना जारी करण्यात आली आहे़ नाशिक शहर, नाशिकरोड, गंगापूर या ठिकाणी मिरवणुकीच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. गुरुवारी (दि़१५) दुपारी बारा ते मिरवणूक संपेपर्यंत या बदललेल्या मार्गावरून वाहतूक केली जाणार आहे़ मिरवणुकीला रविवारी दुपारी बारा वाजेपासून वाकडी बारव (चौक मंडई) येथून सुरुवात होईल़ ही मिरवणूक जहांगिर मशीद - दादासाहेब फाळके रोड - फु ले मार्केट - बादशाही लॉज कॉर्नर - विजयानंद थिएटर - गाडगेमहाराज पुतळा - गो़ ह़ देशपांडे पथ - धुमाळ पॉइंट - सांगली बँक सिग्नल - एमजी रोड - मेहेर सिग्नल - स्वामी विवेकानंद रोड - अशोकस्तंभ - नवीन तांबट आळी - रविवार कारंजा - होळकर पूल - मालेगाव स्टॅण्ड - पंचवटी कारंजा - मालवीय चौक - परशुराम पुरिया रोड - कपालेश्वर मंदिर - भाजीबाजार - म्हसोबा पटांगणावरून विसर्जन ठिकाणी जाणार आहे़ या कालावधीत निमाणी बसस्थानकातून पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बसेस या पंचवटी डेपोतून सुटतील़ तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील, तर पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल कन्नमवार पुलावरून जातील़ रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या सर्व बसेस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील़
श्रीगणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक मार्गात बदल
By admin | Updated: September 13, 2016 01:48 IST