शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

By admin | Updated: August 7, 2014 01:41 IST

श्रावणी सोमवारनिमित्त वाहतूक मार्गात बदल

 

नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते़ यासाठी जिल्हाभरातून भाविक त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मेळा स्टॅण्डवर मोठी गर्दी करतात़ सीबीएस परिसरात गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्तालयाने येत्या रविवारी (दि़ १०) दुपारी २ पासून ते सोमवारी (दि़ ११) रात्री ८ वाजेपर्यंत सीबीएस परिसरातील मेळा स्टॅण्ड येथून जाणाऱ्या शरणपूररोडवरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत़ सीबीएस चौकातून शरणपूररोडने टिळकवाडी चौफु लीपर्यंत जाणाऱ्या रोडवर एस़टी़ बसेस व शहर वाहतुकीच्या बसेस वगळून इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे़ सीबीएस चौकातून टिळकवाडी सिग्नलकडे जाणारी वाहने सीबीएस चौकातून मोडक सिग्नल, हॉटेल राजदूतमार्गे किंवा सीबीएस सिग्नल येथून मेहेर सिग्नल, अशोकस्तंभमार्गे गंगापूररोडने पुढे इतरत्र जातील़ शरणपूररोडवरील टिळकवाडी सिग्नल येथून सीबीएस चौकाकडे जाण्यास एस़टी़ बसेस व शहर वाहतूक बसेस वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे़ टिळकवाडी सिग्नल येथून सीबीएसकडे जाणारी वाहतूक ही टिळकवाडी सिग्नल, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नलवरून सीबीएसकडे जातील किंवा टिळकवाडी सिग्नलवरून पंडित कॉलनीमार्गे गंगापूररोडने अशोकस्तंभमार्गे पुढे इतरत्र जातील़हॉटेल राजदूत चौफु लीकडून शरणपूररोड मेळा स्टॅण्डपावेतोचा मार्ग हा सर्व एसटी बसेस व शहर वाहतुकीच्या बसेस वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत असून, सदरचा मार्ग हा फ क्त मेळा स्टॅण्ड ते हॉटेल राजदूत असा एकेरी वाहतुकीसाठी खुला असणार आहे़ हे निर्बध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाची वाहने यांना लागू राहणार नाही़ (प्रतिनिधी)