पंचवटी : मला तीन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वण्या आठवतात; परंतु आमच्या घराकडून कधीच शाही मिरवणूक गेली नव्हती. आम्ही राहत असलेल्या मार्गावरून पहिल्यांदाच शाही मिरवणूक गेल्याने आम्ही पुण्यवान आहोत, असे म्हणत शाहीमार्गात बदल केल्याने नवीन शाहीमार्गावर राहणाऱ्या शेकडो भाविकांना साधू-महंतांचे दर्शन झाल्याने त्यांनी मनोमनी समाधान व्यक्त केले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीत प्रशासन व साधू-महंतांनी बदल केल्याने नवीन शाहीमार्गावर राहणाऱ्या शेकडो भाविकांनी भल्या पहाटेपासूनच साधू-महंतांचे स्वागत व दर्शनासाठी मिळेल तेथे गर्दी केली होती. कोणी इमारतीच्या टेरेसवर तर कोणी थेट मंदिरांच्या छतावर बसलेले दिसले. कोणी झाडावर चढून मिरवणुकीतील साधू-महंतांचे दर्शन घेतले. यंदाच्या सिंहस्थ शाही मिरवणूकनिमित्ताने पहिल्यांदाच मिरवणूक मार्गात बदल केल्याने शेकडो भाविकांना पहिल्यांदाच शाही पर्वणीत सहभागी झालेल्या साधू-महंतांचे दर्शन झाले आणि मिरवणूक मार्गावरील बदल भाविकांच्या पथ्यावर पडला.
मिरवणूक मार्गावरील बदल रहिवाशांच्या पथ्यावर
By admin | Updated: August 29, 2015 22:58 IST