शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विचार बदला, जीवन बदलेल ! : सूरजभाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:44 IST

मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढत असले तरी आजचा दिवस खूपच चांगला गेला, असा विचार करून रात्री निद्रा करा आणि सकाळी उठतानाही हसत मुखाने उठा, विचार बदलला तर जीवनही बदलेल, असे विचार माउंट अबू येथील ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी व्यक्त केले.

नाशिक : मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढत असले तरी आजचा दिवस खूपच चांगला गेला, असा विचार करून रात्री निद्रा करा आणि सकाळी उठतानाही हसत मुखाने उठा, विचार बदलला तर जीवनही बदलेल, असे विचार माउंट अबू येथील ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी व्यक्त केले.  पंचवटीतील यशवंतराव महाराज पटांगणावर नाशिक वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि.२५) स्व. माणेकलाल भटेवरा स्मृती व्याख्यानाअंतर्गत सूरजभाई यांनी ‘जीवन : शंका समाधान’ या विषयावर गुंफले. मीनल साठ्ये यांनी त्यांची मुलाखत घेतली. गेल्या चाळीस वर्षात देशाने खूप प्रगती केली तसेच खूप संपत्ती निर्माण केली. शिक्षणाच्या सोयी केल्या, डॉक्टरही घडविले. परंतु रोग बरे होण्याऐवजी वाढतच गेले याचे कारण म्हणजे माणसांमध्ये सकारात्मक बदल होण्याऐवजी नकारात्मक भावना वाढीस लागली आहे. यात चूक म्हणजे आपण आपल्या आचार आणि विचारांपेक्षा इंग्रजांच्या जीवनशैलीला आत्मसात केले आहे. असे सांगून सूरजभाई यांनी आपण स्वत:ला बदलले पाहिजे. आणि स्वत:ला बदलणे कठीण नाही. दिवसभरातील घटनांचा सकारात्मक विचार करून निद्रा घेतली आणि त्याच ऊर्जेने सकाळी हसतमुखाने दिवसाची सुरुवात केली, तर विचारांबरोबरच जीवनदेखील बदलले जाते. मानव हा मूलत: बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळे जीवन हे सुखासाठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वासंती दीदी तसेच पुष्पा दीदी आदी उपस्थित होत्या.आजचे व्याख्यान ,  विषय : अणु ऊर्जेचा विध्वंसक महाभ्रम आणि जैतापूर प्रकल्प. , वक्ते : राजेंद्र फातर्णेकर.

टॅग्स :Nashikनाशिक