शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

श्री गणेश बॅँकेत ‘बचाव’चा झेंडा बॅँकेत घडले परिवर्तन

By admin | Updated: June 23, 2015 01:49 IST

श्री गणेश बॅँकेत ‘बचाव’चा झेंडा बॅँकेत घडले परिवर्तन

 नाशिक : श्री गणेश सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १२ संचालकपदांच्या जागांसाठी काल (दि.२२) मतमोजणी होऊन बॅँकेत सत्ताधारी माधवराव मोरे यांच्या संघर्ष पॅनलचा शरद कोशिरे यांच्या नेतृत्वाखालील श्री गणेश बॅँक बचाव पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवित धुव्वा उडविला. गणेश सहकारी बॅँकेसाठी शरद कोशिरे यांच्या नेतृत्वाखाली श्री गणेश सहकारी बॅँक बचाव पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. १२ जागांसाठी २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सकाळी आठ वाजेपासून येथील समर्थ मंगल कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. श्री गणेश सहकारी बॅँकेसाठी ४ हजार ८८८ मतदार असून, रविवारी नाशिक येथील अभिनव बालविकास मंदिर, तसेच पिंपळगाव येथील क. का. वाघ महाविद्यालयात मतदान केंद्रावर ५३ टक्के मतदान झाले होते. सर्वसाधारण गटातील सात जागांसाठी १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात सर्वाधिक मते कोशिरे यांच्या पॅनलमधील उमेदवारांना मिळाली. त्यात दीपक पिंगळे-१४४६, रमाकांत सूर्यभान पाटील-१४२६, विकास विठ्ठलराव सावंत-१४१७, उन्मेश डुंबरे-१३८७, रामनाथ मुंदडा-१३५३, श्यामराव तांबोळी-१३५१, प्रकाश खर्डे-१३४९ आदिंचा समावेश होता. या गटातून माधवराव मोरे यांच्यासह मुकुंद मोरे,भाऊसाहेब गवळी, शिवाजी बोराडे आदिंचा पराभव झाला. महिला राखीव गटाच्या दोेन जागांसाठी हिरा लक्ष्मण हांडगे-१४४० व छाया वाल्मीक निखाडे-१४०२ या दोन्ही महिला उमेदवार विजयी झाल्या. अनुसूचित जाती/जमाती संवर्गाच्या एका जागेसाठी राजाराम लोहकरे-१५०१ यांनी अरुण काळे यांचा पराभव केला. इतर मागास प्रवर्ग गटातून गणेश बॅँक बचाव पॅनलचे नेते शरद कोशिरे यांनी सर्वाधिक १५६२ मते मिळवून शिवाजी डुंबरे यांचा ७७८ मतांनी पराभव केला. विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी अलका रमेश सानप यांनी १५१० मते मिळवून सुनील सोनवणे यांचा ५३६ मतांनी पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक गोपाळ मावळे यांनी काम पाहिले. विजयानंतर शरद कोशिरे यांनी समर्थकांसह जल्लोष केला. बॅँकेच्या थकीत वसुलीसाठी शरद कोशिरे यांनी कष्ट घेऊन बॅँकेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न केल्यानेच सभासदांनी त्यांच्या पॅनलवर विश्वास टाकल्याचे निकालावरून स्पष्ट होते.(प्रतिनिधी)