शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

चांदवडला महामार्ग ठप्प

By admin | Updated: September 16, 2015 00:04 IST

रास्ता रोको : असंख्य कार्यकर्त्यांनी करून घेतली अटक

चांदवड : येथे भीषण दुष्काळी परिस्थितीत शासन काहीच सहकार्य करत नसल्याच्या निषेधार्थ चांदवड तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी दुपारी १२ वाजता चांदवड पेट्रोलपंप चौफुलीवर रास्ता रोको व जेलभरोे आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनाने मुंबई-आग्रारोडवरील वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. पंचायत समितीच्या आवारातून तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, पक्ष निरीक्षक हरिश्चंद्र भवर यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देत कार्यकर्ते व नेते आग्रारोड चौफुलीवर आले.रास्ता रोको व जेलभरो आंदोलनादरम्यान तहसीलदार मनोज देशमुख व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा तालुक्यात सन १९७२ सालाच्या दुष्काळापेक्षाही भयंकर दुष्काळ पडलेला आहे. अशा परिस्थितीत शासन लक्ष देत नाही. शेतकरी, शेतमजूर यांचे हाल होत आहेत. अन्नधान्याचा तुटवडा व महागाईचा कळस झाला आहे. या परिस्थितीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण तालुका दुष्काळी जाहीर करावा, चांदवड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांची कर्ज व वीजबिले माफ करावी, कर्ज वसुली त्वरित थांबवावी, राज्य सरकारने संपूर्ण जिल्ह्यामध्ये व प्रत्येक गावामध्ये जनावरांच्या छावण्या सुरू करून चारा, पाणी, पशुखाद्य पुरवावे. यावेळी गटनेते अनिल काळे, तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, भाऊसाहेब जिरे, पक्षनिरीक्षक हरिश्चंद्र भवर, विजय जाधव, खंडेराव अहेर यांची भाषणे झाली. आंदोलनात खंडेराव अहेर, अशोक खैरे, बाळासाहेब माळी, डॉ. अरुण निकम, अरुण न्याहारकर, मंगला बर्डे, सुरेखा जिरे, भाऊसाहेब जिरे, शंकर शिंदे, संजय भांबर, जिल्हा परिषद सदस्य विलास माळी, विनोद माळी, उध्दव चौधरी, विजय जाधव, बाकेराव जाधव, महेश देशमाने, दत्तात्रय वाकचौरे, शहाजी भोकनळ, प्रकाश शेळके, मतीन घासी, यू. के. अहेर, रावसाहेब भालेराव, सुखदेव जाधव, दिलीप धारराव, संजय पूरकर, राजेश गांगुर्डे, रिजवान घासी, अंबादास ठोंबरे, राजेंद्र ठोंबरे, गंगाधर बिडगर आदिंसह असंख्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)