नांदगावी मशिनरी बसविण्यात आली असून, उर्वरित प्लांटचे काम सुरू आहे. हा प्रकल्पदेखील लवकरच सुरू होत आहे. तर चांदवड येथील मशिनरी उभारल्यानंतर वीज जोडणीचे काम बाकी होते. ते पूर्ण झाले. त्यामुळे ८/१० दिवसांत प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. सिन्नरला काम पूर्ण झाले असून, त्याची टेस्टिंग घेतली जात आहे.
निफाड तालुक्यात निफाड व पिंपळगाव बसवंत येथे ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्लांट उभारण्यात आले असून, त्यांचे काम पूर्ण झाले आहे. येत्या २/४ दिवसांत या प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याचे समजते.
इन्फो
तालुका : कामाची स्थिती
त्र्यंबकेश्वर : अद्याप काहीच हालचाल नाही.
हरसूल : केवळ वीज जोडणी शिल्लक.
देवळा : काम अंतिम टप्यात, लवकरच लोकार्पण.
येवला : यापूर्वीच लोकार्पण झाले.
कळवण : काम अंतिम टप्प्यात, पुढील आठवड्यात लोकार्पण.
सुरगाणा : काम पूर्ण, पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण होईल.
इगतपुरी : दोन दिवसांपूर्वीच लोकार्पण झाले.
पेठ : टेंडर पण निघाले नाही, काहीच हालचाल नाही.
नांदगाव : मशिनरी बसविण्याचे काम सुरू.
चांदवड : काम पूर्ण, लवकरच होणार कार्यान्वित.
मालेगाव : यापूर्वीच झाले लोकार्पण.
सिन्नर : काम झाले पूर्ण.
निफाड : काम पूर्ण, टेस्टिंग चालू आहे.
सटाणा : मशिनरी पण नाही. काम ठप्प आहे.
दिंडोरी : प्लांट पेठ तालुक्यात स्थलांतरित.
(०४ चांदवड,१)