चांदवडला दानशूर व्यक्तिंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 04:10 PM2020-01-30T16:10:24+5:302020-01-30T16:10:52+5:30

चांदवड - चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन संस्था ही ग्रामीण भागातील नावजलेली शैक्षणिक संस्था असून ही संस्था ग्रामीण भागात एक स्वतंत्र विद्यापीठ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती पुखराज बोरा यांनी केले. चांदवड येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्थेत विविध विभागाचे नामकरण उच्च न्यायालयाचे पुखराज बोरा यांच्या करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दानशूर व्यक्तींता सत्कार सोहळा यानिमित्त संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वस्त संपतलाल सुराणा होते.

Chandwad honors charity people | चांदवडला दानशूर व्यक्तिंचा सत्कार

चांदवड येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या कॉन्फरन्स सभागृहाचे उद्घाटनप्रसंगी पुखराज बोरा, सोहनलाल भंडारी, राजेंद्र बोरा, राजेश साखला, संजय चोपडा, चंद्रभान बागरेचा, बेबीलाल संचेती, अजितकुमार सुराणा, जवाहरलाल आबड, शांतीलाल अलिझाड, अरविंद भन्साळी, सुनील चोपडा, दिनेशकुमार लोढा आदी.

Next
ठळक मुद्दे नामकरण : नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्था


यावेळी संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या कॉन्फरन्स सभागृह, होमीओपॅथीक मेडिकल कॉलेजमधील स्व. झुंबरलाल ताराचंद चोपडा सोनोग्राफी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभानंतर झालेल्या कार्यक्रमात सुमारे ५० हुन अधिक दानशूर व्यक्तिंचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. प्रास्ताविक उपाध्यक्ष अजितकुमार सुराणा केले. ज्ञानगंगा योजनेची माहिती वर्धमान लुंकड यांनी दिली.यावेळी राजेंद्र बोरा व राजेश साखला,सोहनलाल भंडारी यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन स्वप्ना थोरात, मुकेश पारेवाल यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून ,संजय राजेंद्र चोपडा , डॉ. चंद्रभान बागरेचा, प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, सचिव जवाहरलाल आबड, अजितकुमार सुराणा ,रविंद्र संचेती,कांतीलाल बाफना,नंदकिशोर ब्रम्हेचा, दिनेशकुमार लोढा, अरविंद भन्साळी, शांतीलाल अलिझाड, महावीर पारख, झुंबरलाल भंडारी,प्रकाश बोकडिया, सुमतीलाल सुराणा,वर्धमान लुंकड, डॉ.सुनील बागरेचा, सुनील चोपडा , सुभाष श्रीश्रीमाळ आदि व्यासपीठावर उपस्थित होते.---
 

Web Title: Chandwad honors charity people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.