चांदवड : शहरातील प्रत्येक प्रभागात आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्याची मागणी नगरसेवक राजमोहमंद तांबोळी व अॅड. नवनाथ आहेर यांनी प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, मुख्य अधिकारी अभिजित कदम, तालुका आरोग्य अधिकारी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सर्वत्र कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नागरिकमिंध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या काळात काही डॉक्टरांनी उपचार तपासणी बंद केली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच प्रभागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. खोकला, ताप, या आजारांनादेखील लोक घाबरत आहे. त्यामुळे उपचारासाठी शासकीय रुग्णालयात जाणे टाळत आहे.त्यामुळे प्रत्येक प्रभागात आरोग्य तपासणी केंद्राची मागणी करण्यात आली आहे.
चांदवडला प्रत्येक प्रभागात तपासणी केंद्राची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:28 IST