शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड बाजार समिती बेमुदत बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:15 IST

चांदवड : कोणतेही स्पष्ट कारण न देता चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देसमिती गेल्या चार दिवस सलग सुट्टी आल्याने बंद सुमारे ३०० टॅक्ट्ररचे लिलाव करून घेतले

चांदवड : कोणतेही स्पष्ट कारण न देता चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या निर्णयामुळे शेतकºयांना आपला कांदा विकण्यासाठी इतर बाजार समित्यांना आधार घ्यावा लागणार आहे. यामुळे शेतकºयांवर नाहक आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ आली आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या चार दिवस सलग सुट्टी आल्याने बंद होती. त्यात मंगळवारी कांदा शेतमालाचे लिलाव होतील या अपेक्षेने सकाळी शेतकºयांनी आपला कांदा लिलावासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला होता. लिलावाची निर्धारित वेळ टळून गेली तरी लिलाव सुरु होत नसल्याने संतप्त शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आले त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाºयांनी व्यापाºयांकडे विचारणा केली की, लिलाव का बंद आहेत? दरम्यान, काही व्यापारी लिलावात उपस्थित झाले होते. त्यांनी सुमारे ३०० टॅक्ट्ररचे लिलाव करून घेतले व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही पदाधिकाºयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विचारविनिमय करून कृषी उत्पन्न बाजार समिती बेमुदत बंदचा आदेश दिला. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीत चौकशी केली असता वेगवेगळी उत्तरे मिळाली तर कृषी उत्पन्न बाजार समितीत पाणी नाही, मार्च एन्डची कामे यामुळे बाजार समिती बेमुदत बंद करण्याचे ठरले असे मत आले तर काही कर्मचाºयांनी सांगितले की, मंगळवारी सुट्टी घ्यावी असे व्यापाºयांनी सांगितले होते; मात्र लेखी न दिल्याने सुट्टी जाहीर न केल्याने शेतकºयांची अडचण झाली असे तर बाजार समितीत पाणी नसले तरी विकत पाणी घेऊन काम चालू आहे असे दोन वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त केले गेले. व्यापारी असोसिएशनने सांगितले की, मंगळवार व बुधवार सुट्टी घ्यावी असा अर्ज दिला नाही. दरम्यान आज मंगळवारीही व्यापाºयांनी लिलावात भाग घेतला; मात्र अचानक बाजार समिती प्रशासनाने बेमुदत बंदचा निर्णय घेऊन शेतकºयांची कुंचबना केल्याचे सांगण्यात आले. याप्रश्नी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.