शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड : नामदेवराव जाधव विद्यालयात विविध आकर्षक उपकरणांची मांडणी ४३ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:19 IST

तालुकास्तरीय ४३ व्या विज्ञान प्रदर्शनातील बालवैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृती जिल्हा नव्हे तर देश पातळीवर चमकवून चांदवडचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी तालुकापातळीवरील विज्ञान प्रदर्शनात अध्यक्षपदावरून बोलताना केले.

ठळक मुद्देउद्घाटन सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने विज्ञान प्रदर्शनात सुमारे २२० उपकरणे पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित

चांदवड : तालुकास्तरीय ४३ व्या विज्ञान प्रदर्शनातील बालवैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृती जिल्हा नव्हे तर देश पातळीवर चमकवून चांदवडचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी तालुकापातळीवरील विज्ञान प्रदर्शनात अध्यक्षपदावरून बोलताना केले.शिक्षण विभाग, पंचायत समिती, चांदवड तालुका विज्ञान अध्यापक संघ, कै. नामदेव बाबूराव जाधव माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार (दि. १२) व बुधवार (दि.१३) या दिवशी ४३ वे चांदवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन येथील नामदेवराव बाबूराव जाधव विद्यालयात आयोजित केले आहे. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती अमोल भालेराव, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य कविता धाकराव, पंचायत समिती सदस्य निर्मला अहेर, देवीदास अहेर, गटशिक्षणाधिकारी बी.टी. चव्हाण, प्राचार्य डी.आर. बारगळ, राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळू बोरसे, केदू देशमाने, संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. स्वप्निल जाधव, सचिव प्रतीक जाधव, मुख्याध्यापक एल.एम. ठोसर, देवमन पवार, तालुका अध्यापक संघाचे विनायक पाटील, एन.पी. अहेर, प्रा. विक्रम काळे, वाय.एन. देवरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी बी.टी. चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन विस्तार अधिकारी आर.एन. निकम व एस.एस. कांबळे यांनी केले. यावेळी शाळेच्या प्रमुख सुमनबाई नामदेवराव जाधव यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या विज्ञान प्रदर्शनात सुमारे २२० उपकरणे ठेवण्यात आली असून, प्रत्येक शाळेने त्यात भाग घेतला आहे. कार्यक्रमास मुख्याध्यापक जयश्री गोळेचा, श्रीधर देवरे, आर.एन. निकम, श्रीधर देवरे, एस.एस. कांबळे, श्रीमती एस.एस. रुईकर, बी.एन.सोनवणे, एन.पी.अहेर, विनायक पाटील, डी.के.शिंदे, साहेबराव देशमाने, शिवाजी शिंदे, केशवराव जाधव, सतीलाल शिरसाठ, जितेंद्र मानकर आदींसह सर्व केंद्रप्रमुख, अध्यापक संघ, सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.