चांदवड : शहरात विविध ठिंकाणी रामजमोत्सव साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. नगर परिषद कार्यालयापासून मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणुकीच्या प्रारंभी ढोलताशा पथक, चित्ररथ त्यापाठोपाठ तालुक्यातील भजनी मंडळ, श्रीरामाचा रथ, विमल विद्या गु्रपचे कार्यकर्ते जयबाबाजी जनार्दन स्वामी भक्त मंडळ, अनाथ आश्रम माता-पिता शास्त्रीनगर, लासलगाव आदिंनी सहभाग घेतला होता. मिरवणुकीत शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला.मिरवणुकीत सार्वजनिक रामनवमी उत्सव समिती, हिंदुएकता मंचचे कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास चौधरी व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. ठिकठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली. उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल ललवाणी , तुषार झारोेळे, उमेश दांड, रामेश्वर भावसार, गोटू सोनवणे, राजू भापकर,विवेक बेलदार, रवि बडोदे, सागर निकम, हिरामण काळे, संतोष देशमाने, सोनु राहाणे, प्रसाद प्रजापत, अनिल कोतवाल, संतोष बडोदे, नीलेश देशमुख, एकनाथ सोनवणे,प्रशांत ठाकरे, नीलेश काळे, मनोज जाधव, मुकेश अहेर, गणेश राजगिरे, देवा बागुल, पिनू बागुल, संदीप बडोदे, विशाल जाधव, मनोज बांगरे, राहुल बडकस, समितीचे कार्यकर्त्यांनी सहभागघेतला. मिरवणुकीचा समारोप हनुमान मंदिरात महाप्रसादाने झाला. (वार्ताहर)
राम जन्मोत्सवानिमित्त चांदवडला मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 23:51 IST