शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चांदवडला डॉक्टर डे साजरा

By admin | Updated: July 5, 2014 00:27 IST

चांदवडला डॉक्टर डे साजरा

चांदवड : फॉमिली डॉक्टर म्हणजे पारिवारिक मित्र, वर्षभर आपल्या आरोग्यासाठी झटणारे... परिवारातील या मौल्यवान मित्रांचे अभिनंदन करण्याचा अनमोल क्षण म्हणजे डॉक्टर डे...डॉक्टर डेचे निमित्त साधून मध्य सोशल फाउंडेशनतर्फे रोजच्या दगदगीतून मार्ग काढण्यासाठी डॉक्टरांसाठी विशेष शिबिर स्टेस मॅनेजमेंटचे आयोजन लाईफकोचे पुणे प्रख्यात ट्रेनर शशीकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवडला मातोश्री लॉन्स येथे करण्यात आले.चांदवड व देवळा तालुक्यातील डॉक्टर व मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. प्रारंभी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी आपल्या भाषणात आजपर्यंत कोणीही डॉक्टरांसाठी असा कार्यक्रम ठेवला नसल्याचा उल्लेख करून डॉक्टर डेनिमित्त अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मध्य सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष भूषण कासलीवाल यांचे विशेष कौतुक केले, तर डॉ. भूषण शिरुडे यांनी अशाच कार्यक्रम स्व. माजी आमदार जयचंद कासलीवाल यांनी २० वर्षांपूर्वी केल्याची आठवण करून दिली, तर भूषण कासलीवाल यांनी डॉक्टर हे देवाने पाठविलेले दूत आहेत. हा कार्यक्रम करण्यामागे कुठलाही राजकीय अजेंडा नसून राजकारणविरहीत समाजकारण हा या सोशल फाउंडेशनचा उद्देश आहे. रुग्ण आजारी पडल्यावर डॉक्टरांच्या विनवण्या करतो; मात्र दुरुस्त झाल्यावर साधे आभारही मानत नाही. डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा डॉक्टर डे साजरा केल्याचे सांगितले. शशिकुुमार यांनी मार्गदर्शन करताना स्ट्रेस चालवण्यासंबंधी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्यांनी माणूस व त्याचे शरीर या मधला फरक उदाहरणांसह स्पष्ट करून दिला. काम करताना आपण बऱ्याच वेळा कळत न कळत चुका करतो. फक्त आपण जर आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर करून जर काम करत असू तर त्यापासून स्ट्रेस येतो, पण ज्ञानाबरोबर जर ते काम आपण मनापासून करत असू तर त्याचे आपल्याला समाधान असते, स्ट्रेस कमी करण्याचे विविध प्रकारचे उपाय त्यांनी सांगितले. या डॉक्टर डे कार्यक्रमातील डॉक्टर भूषण कासलीवाल यांनी मध्य सोशल फाउंडेशनच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार केला . कार्यक्रमास चांदवड व देवळा तालुक्यातील डॉक्टर उपस्थित होते. (वार्ताहर)