शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अशुद्ध पाणीपुरवठ्याने चांदोरीकर बेजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:28 IST

निफाड तालुक्यातील मुख्य गाव असलेल्या चांदोरीला गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या १० दिवसांपासून गाव विकासाकरिता अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत.

ठळक मुद्देपरिसरात दुर्गंधी : रुग्णांच्या संख्येत वाढ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नाशिक : निफाड तालुक्यातील मुख्य गाव असलेल्या चांदोरीला गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या १० दिवसांपासून गाव विकासाकरिता अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत.चांदोरी गावालगत असलेल्या गोदावरी नदीनजीक ग्रामपालिकेची विहीर असून, त्यातून पाणी उपसा करून नवीन बांधलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तेथून नवीन बांधलेल्या पाण्याच्या टाकीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र या जलशुद्धीकरण केंद्रासह परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून, डासांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात तारकुंपण तसेच विजेची सुविधा नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी वर्गासाठी असलेल्या पडीत घरांचा वापर परिसरात असलेले काही लोक शौचालय म्हणून वापर करत असल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे.पुरेशा प्रमाणात सुरक्षा नसल्याने तरळीरामांचे आश्रयस्थान निर्माण झाले आहे. जलशुद्धीकरण केंद्रानजीक असलेल्या पाणीपुरवठ्याच्या पाइपमधून पाणीगळती होत असल्याने परिसरात चिखल झाला आहे. त्यामुळे डुक्करांचा वावर वाढला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीच सदर जलकुंभाचे काम केले असून, त्यास संरक्षक कठडे नाही, तसेच जलकुंभावर जाण्यासाठी जिन्याच्या पायºया मोडकळीस आल्या आहेत. ग्रामपालिका प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून ग्रामस्थांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.डेंग्यू रु ग्णसंख्येत वाढचांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डेंग्यूचे प्रमाण कमी असल्याचे दावे करत असले तरी गावाच्या विविध भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. रेकॉर्डवर नोंदवल्या जात असलेल्या आकडेवारीपेक्षा डेंग्यूचा फैलाव जास्त असल्याचे प्रॅक्टिस करणाºया डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याशिवाय मलेरियासह तापाच्या रुग्णांमध्येही लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. त्यामुळे गावामध्ये चिंतेचे वातावरण असून, सरकारी दवाखान्यासह खासगी दवाखान्यांमध्येही रुग्णांची रीघ लागली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणWaterपाणी