शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरी गाव पूर्णत: लॉकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 22:36 IST

कोरोना विषाणूचा आपल्या गावात शिरकाव होऊ या साठी चांदोरी करांनी कंबर कसली आहे. या गावात संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय ग्रामपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अखेरचा बाजार भरवला गेला होता मात्र, मोठया प्रमाणात गर्दी झाल्याने संपूर्ण बाजार उठविण्यात आला. ग्रामपालिकेने च्या वतीने पूर्णत: लॉकडाउन करण्यात आले आहे.

चांदोरी : कोरोना विषाणूचा आपल्या गावात शिरकाव होऊ या साठी चांदोरी करांनी कंबर कसली आहे. या गावात संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय ग्रामपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार अखेरचा बाजार भरवला गेला होता मात्र, मोठया प्रमाणात गर्दी झाल्याने संपूर्ण बाजार उठविण्यात आला. ग्रामपालिकेने च्या वतीने पूर्णत: लॉकडाउन करण्यात आले आहे. कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावातील सर्व दुकाने ,सेवा येत्या ६ एप्रिलपर्यंत पुर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवा वगळता एखादे दुकान सुरू असल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश ग्रामपालिका प्रशासनाने दिले आहे. कोणतीही व्यक्ती पार, ओटा, रस्ता, मंदिर, मस्जिद, सार्वजनिक चौक या ठिकाणी विना कामे बसणाऱ्या व फिरणार्या वर संचार बंदीच्या कायद्या नुसार कारवाई करण्याचे आदेश सायखेडा पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी दिले आहे. तसेच गावाच्या प्रवेश द्वारा जवळ आपत्ती व्यवस्थापन समिती सेवा देत आहे. समितीचे स्वयं सेवक ग्रामपालिकेच्या आदेशानुसार गावातील ग्रामस्थांना बाहेर जाण्यास व इतरांना येण्यास मज्जाव केला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये गावकऱ्यांनी स्वत:हूनच गावच्या सीमा बंद केल्या आहेत. विशेष म्हणजे काही गावांमध्ये तर आधारकार्ड दाखवूनच प्रवेश दिला जात आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तसेच गावातील युवावर्गही यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावात लॉकडाउन मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. बाहेरून येणाºया वाहने किंवा नागरिकांना गावाच्याच प्रवेशद्वारावर अडविले जास्त आहे. तेथेच खातरजमा केल्यानंतर गावात प्रवेश दिला जात आहे. गावातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी उघडली जात असून, त्यानंतर ठरावीक वेळेनंतर बंद करण्यात येत संचारबंदीचे पालन केले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य