शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

बुधवारी चंद्रदर्शनाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:47 IST

मुस्लीम समाजाच्या उपवासाचा (रोजा) पवित्र महिना रमजान पर्वाला बुधवारी (दि.१६) संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संध्याकाळी चंद्रदर्शनाचा प्रयत्न करावा व चंद्रदर्शन घडल्यास शाही मशिदीत प्रत्यक्ष हजर राहून धर्मगुरूंच्या बैठकीत ग्वाही द्यावी, असे आवाहन शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे.

नाशिक : मुस्लीम समाजाच्या उपवासाचा (रोजा) पवित्र महिना रमजान पर्वाला बुधवारी (दि.१६) संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संध्याकाळी चंद्रदर्शनाचा प्रयत्न करावा व चंद्रदर्शन घडल्यास शाही मशिदीत प्रत्यक्ष हजर राहून धर्मगुरूंच्या बैठकीत ग्वाही द्यावी, असे आवाहन शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे.  इस्लामी कालगणनेतील चालू उर्दू महिना ‘शाबान’ची येत्या बुधवारी २९ तारीख असून, संध्याकाळी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात आहे. बुधवारी चंद्रदर्शन घडल्यास गुरुवारी रमजानचा पहिला उपवास मुस्लीमबांधव करतील. चंद्रदर्शनाची अधिकृत ग्वाही प्राप्त न झाल्यास चालू उर्दू महिन्याचे तीस दिवस पूर्ण करून शुक्रवारपासून रमजानची सुरुवात होईल. एकू णच रमजान पर्वचा प्रारंभ चंद्रदर्शनावर अवलंबून असून, येत्या बुधवारी संध्याकाळी याबाबत निर्णय धर्मगुरूंकडून परिस्थितीनुसार घेण्यात येणार आहे. बुधवारी संध्याकाळी शाही मशिदीत चांद समितीच्या वतीने शहरातील सर्व मशिदींच्या धर्मगुरूंना बैठकीसाठी बोलाविण्यात आले आहे. बुधवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त झाल्यास रात्रीपासूनच विशेष ‘तरावीह’च्या नमाजपठणाला प्रारंभ होईल.

टॅग्स :Nashikनाशिक