शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘चलो भायखळा’ भुजबळ समर्थकांची हाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:59 IST

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी छगन भुजबळ यांचा जामीन मंजूर केला असला तरी, त्याबाबतची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यासाठी अवधी लागणार असल्याचे पाहून आता सोमवारी सकाळी अकरा वाजता भुजबळ तुरूंगातून जामीनावर बाहेर पडतील असे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देशक्तीप्रदर्शनाची तयारी : सोशलमाध्यमातून आवाहन

नाशिक : तब्बल २६ महिन्यानंतर राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ जामीनावर तुरूंगातून सुटणार असल्याने त्यांची कार्यभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भायखळा येथील आॅर्थरोड तुरूंगाबाहेर शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी भुजबळ समर्थकांनी सुरू केली असून, त्यासाठी सोशल माध्यमाद्वारे ‘चलो भायखळा’ अशी साद घातली जात आहे. नाशिक शहरातून हजारो कार्यकर्ते सोमवारी मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीला लागले आहेत.मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी छगन भुजबळ यांचा जामीन मंजूर केला असला तरी, त्याबाबतची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यासाठी अवधी लागणार असल्याचे पाहून आता सोमवारी सकाळी अकरा वाजता भुजबळ तुरूंगातून जामीनावर बाहेर पडतील असे सांगितले जात आहे. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याने सोमवारी सकाळी ते रूग्णालयातून तुरूंगात हजर होतील व तेथील प्रक्रिया पुर्ण झाल्यावर बाहेर येतील त्यावेळी त्यांचे शक्तीप्रदर्शनाद्वारे जंगी स्वागत करण्याची तयारी राष्टÑवादी कॉँग्रेस व भुजबळ समर्थकांनी केली आहे. त्यासाठी सर्वांनी भायखळ्याच्या आॅर्थरोड कारागृहाबाहेर जमावे असे आवाहन करण्यात आले असून, सोशल माध्यमाद्वारे ‘चलो भायखळा’ अशी साद घालण्यात आली आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच या संदर्भातील संदेश फिरू लागले असून, ‘टायगर इज कमबॅक’ अशी पोस्ट तयार करून त्याखाली ‘चलो भायखळा’असे नमूद करण्यात आले आहे. भुजबळ यांची कर्मभुमी असलेल्या नाशकात देखील भुजबळ यांच्या स्वागतासाठी तयारी केली जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव भुजबळ लगेचच नाशकात येण्याची शक्यता नसली तरी, त्यांच्याभेटीसाठी हजारोंच्या संख्येने भायखळा येथे जाण्याचे नियोजन केले जात आहे. शनिवारी सकाळी या संदर्भात राष्टÑवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाºयांची बैठक घेतली. भुजबळ यांच्या जामीन मंजूर झाल्याच्या वृत्तापासून राष्टÑवादी भवन पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या रेलचेलीने गजबजले आहे. सोमवारी भुजबळ यांच्या सुटकेप्रसंगी आॅर्थररोड येथे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले तसेच आगामी काळात राष्टÑवादी आक्रमकपणे राजकीय वाटचाल करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक