शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

नाशिकला ‘स्मार्ट सिटी’ साकारणे आव्हानात्मक

By admin | Updated: September 22, 2016 01:32 IST

सीताराम कुंटे : आराखड्यातील त्रुटी दूर करणार

नाशिक : शहरी व्यवस्थापनात नवनवीन संकल्पना आणण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना आहे. नाशिकला स्मार्ट सिटी साकारण्याचे काम आव्हानात्मक असून महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे एसपीव्ही अर्थात नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत नाशिक शहराचा समावेश झाल्यानंतर त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) अर्थात कंपनीची पहिली बैठक सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना कुंटे यांनी सांगितले, नाशिक महापालिकेने सादर केलेल्या आराखड्यानुसार रेट्रोफिटिंग (गावठाण पुनर्विकास) अंतर्गत जुन्या नाशिक परिसराचा पुनर्विकास हाती घेणे आव्हानात्मक आहे, परंतु त्यातून मार्ग काढला जाईल. मुंबईत दाट वस्तीच्या भागात पुनर्विकासाचे काही प्रकल्प राबविण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही पुनर्विकासाची योजना राबविण्याचा विचार राहील. नवीन विचार व्यवस्थापनात आणण्यासाठी स्मार्ट सिटीचा आराखडा आहे. सदर आराखड्यातील असणाऱ्या त्रुटी दूर केल्या जातील. त्यातील आणखी बारकावे शोधून त्यात सुसूत्रता आणली जाईल.