शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गोपनीयतेबाबत तत्कालीन आयुक्तांच्या आदेशाला आव्हान

By admin | Updated: August 6, 2016 01:14 IST

स्थायी समिती : माहिती देण्याचे सभापतींचे आदेश

 नाशिक : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी गोपनीय व महत्त्वाची माहिती कुणालाही उपलब्ध करून न देण्यासंदर्भात काढलेल्या आदेशाचे पडसाद स्थायी समितीच्या सभेत उमटले. काही सदस्यांना नगररचना विभागाकडून आदेश दाखविले गेल्याने त्याची गंभीर दखल सभापतींनी घेतली आणि स्थायी समितीकडे सादर प्रस्तावासंबंधी आवश्यक ती पूरक माहिती त्वरित उपलब्ध करुन देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी २४ जुलै २०१३ रोजी सर्व खातेप्रमुखांसाठी एक परिपत्रक जारी करत त्या-त्या विभागातील गोपनीय व महत्त्वाची माहिती कुणालाही उपलब्ध करून न देण्याचे आदेश काढले होते. याच परिपत्रकाचा आधार घेत खातेप्रमुखांकडून नगरसेवकांना माहिती नाकारली जात होती. नगररचना विभागाकडूनही माहिती नाकारली जात असल्याचा आरोप यापूर्वी स्थायीच्या सभेत दिनकर पाटील यांनी केला होता. त्याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायीच्या सभेत उमटले. यावेळी सभापती सलीम शेख यांनी सांगितले, तत्कालीन आयुक्तांचे आदेश पाहता नगररचना विभाग हा संरक्षण अथवा पोलीस विभागाशी जोडला गेला आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला. सदस्यांना नस्ती न दाखविण्यामागचे गौडबंगाल कळत नाही. आपण स्वत: नगररचना विभागाला चार ते पाच वेळा पत्रव्यवहार केला असता विभागाने उत्तर पाठविले. सदर उत्तरात न्यायालयाचा निर्णय पुढे केला आहे. ज्येष्ट विधीज्ज्ञांशी चर्चा केली असता सदर न्यायालयीन निर्णय हा कल्याण डोंबिवली महापालिकेपुरता मर्यादित आहे. त्या दाव्यात नाशिक मनपा पार्टी नव्हती, परंतु उगाचच न्यायालयाच्या निर्णयाचा बाऊ करत आयुक्तांनी अवास्तव आदेश काढले आहेत.