शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

सेनेपुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान

By admin | Updated: January 15, 2017 00:30 IST

मनसेवर उमेदवार शोधण्याची वेळ : दुरंगी लढत होण्याची शक्यता, इच्छुकांमध्ये चढाओढ

गणेश धुरी नाशिकगेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यात असलेला एकलहरा गट या पंचवार्षिकमध्ये टिकविणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अवघड होऊन बसले आहे. कारण ज्या दोन पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले ते खासदार हेमंत गोडसे यंदा शिवसेनेत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या गटातून नेतृत्व व उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. एकलहरा गटाचे राजकारण संसरी गावाभोवती फिरत असल्याचा इतिहास आहे. पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार हा गट गेल्या दोन पंचवार्षिकपासून आजी-माजी खासदार गोडसे द्वयींमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ताब्यात राहिला आहे. यंदा मात्र हा गट शिवसेना परत मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करेल, हे नक्की.एकलहरा गटावर माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यासह आजी-माजी खासदारांचे प्रभुत्व आहे. खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्याबरोबरच शिवसेना जिल्हाप्रुमख विजय करंजकर, राजाराम धनवटे, अनंत जगताप, भगवान जुंद्रे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, शंकर धनवटे, नितीन जगताप, बाळासाहेब म्हस्के, प्रकाश म्हस्के यांचे नेतृत्व मानले जाते. आता गटाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. या गटात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व कॉँग्रेस यांच्यात चौरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात असली तरी या गटाचा इतिहास पाहता यंदाची लढत दुरंगीच होईल, असे बोलले जाते.