शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:53 IST

कळवण: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यात विविध जिल्हा, राज्यातून १५११ नागरिक आले असून, त्यातील ५९३ नागरिकांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. त्यांच्यात कोणतेही कोरोनाबाबत लक्षण आढळून आलेले नाही.

कळवण: (मनोेज देवरे)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यात विविध जिल्हा, राज्यातून १५११ नागरिक आले असून, त्यातील ५९३ नागरिकांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. त्यांच्यात कोणतेही कोरोनाबाबत लक्षण आढळून आलेले नाही. मात्र मालेगाव येथे सेवेत असलेल्या तालुक्यातील एका पोलीस कर्मचाºयाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. सदर रुग्णावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. सदर पोलीस कर्मचाºयाचा त्याच्या घरातील व्यक्तीशी संपर्क आल्याने कुटुंबातील चार व एका मित्राला मानूर येथील कोरोना केविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. अभोणा येथे ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तयार करण्यात आले आहे. शहरी भागापाठोपाठ आता ग्रामीण व आदिवासी भागात कोरोनाचा शिरकाव झाला असून, तालुक्यातून कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्यामुळे नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. दरम्यान, आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी ती अपुरी असल्याने कोरोनाविरुद्ध मुकाबल्याचे मोठे आव्हान आहे.कळवण उपजिल्हा रुग्णालयात १२ वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असताना फक्त ५ जण कार्यरत आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मालेगावला वर्ग करण्यात आले आहे. कोरोनासंदर्भातील संशयित रुग्ण आढळून आल्यास कळवणला सक्षम वैद्यकीय अधिकारी नसल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडणार आहे. नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने गेलेले तालुक्यात परतले असून, काही नागरिकांनी अद्याप माहिती दिलेली नाही, त्याचाच धसका खासगी आरोग्य यंत्रणेने घेतला आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक