शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

चोख बंदोबस्त तरीही ‘चेन स्नॅचिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 01:33 IST

शहर व परिसरात गणेशोत्सवाच्या अगोदरपासून सुरू असलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना अद्यापही थांबता थांबत नसल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देलागोपाठ दोन घटना : महिलावर्गात तीव्र संताप; पोलिसांविरुद्ध नाराजी

नाशिक : शहर व परिसरात गणेशोत्सवाच्या अगोदरपासून सुरू असलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटना अद्यापही थांबता थांबत नसल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी महाजनादेश यात्रा असल्याने चोख बंदोबस्त तैनात होता; तरीदेखील सकाळी ७.३० वाजता मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. तसेच दौऱ्याच्या पूर्वसंध्येला इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वासननगर भागात महिलेची सोनसाखळी लांबविली.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व फडणवीस नाशकात येणार असल्याने मंगळवारपासूनच शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात केली जात आहे. बुधवारी हजारो पोलीस फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनिमित्त रस्त्यावर होते. तसेच दिवसभर व रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे.संशयास्पद वाहनांची तपासणी पोलीस करत आहे, तरीदेखील चोरटे सोनसाखळी हिसकावण्याचे धाडस करून पोलिसांना आव्हान देत असल्याचे दोन घटनांवरून दिसून आले. लागोपाठ मंगळवारपासून दोन घटना शहराच्या मध्यवर्ती भागात घडल्या. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीपालीनगर येथे माधुरी अजित रुंद्रे (६७) या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्यांची सोनसाखळी लांबविली. रुंद्र या सकाळी फेरफटका मारण्यासाठी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुण चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा केला. सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.दुसºया घटनेत मंगळवारी वासननगर भागात रात्री ८ वाजेच्या सुमारास अनिता कैलास शेलार (४०) या पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लांबविली. या दोन्ही घटना व्हीआयपी नेत्यांच्या दौºयाच्या कालावधीत घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांचा फौजफाटा शहरात असतानाही चोरटे धाडस करत असल्याने एकप्रकारे पोलिसांना हे आव्हानच आहे.उपनगरला घरफोडीउपनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी मंगळवारी गोकुळपार्कमधील एका बंगल्याच चोरट्यांनी घरफोडी करून चोरट्यांनी एक लाख आठ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. याप्रकरणी प्रेमनिवास रामस्वरूप गुप्ता (५९) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या बंद घराचे लॅच लॉक शिताफीने उघडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करत सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी