शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोध नागरे यांना प्रमाणपत्र प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:33 IST

नाशिक मनपाच्या प्रभाग क्रमांक १० ड मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या इंदूबाई सुदाम नागरे यांची सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील यांनी औपचारिक घोषणा करत नगरसेवक पदाचे प्रमाणपत्र प्रदान केले.

सातपूर : नाशिक मनपाच्या प्रभाग क्रमांक १० ड मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या इंदूबाई सुदाम नागरे यांची सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील यांनी औपचारिक घोषणा करत नगरसेवक पदाचे प्रमाणपत्र प्रदान केले.प्रभाग क्रमांक १० ड मधील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २३ जून रोजी मतदान घेण्यात येणार होते. मात्र भाजपाने दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने या निवडणुकीकडे सहानुभूतीपूर्वक पाहिले गेले. त्यामुळे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, मनसे या पक्षांनी निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला नाही. तर अपक्ष उमेदवार दत्तू वामन यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे पोटनिवडणुकीवर बिनविरोधाचे शिक्कामोर्तब झाले होते. यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, मनपा सभागृह नेते दिनकर पाटील, सातपूर प्रभाग सभापती योगेश शेवरे, नगरसेविका पल्लवी पाटील, माधुरी बोलकर, रवींद्र धिवरे, शशिकांत जाधव, विक्रम नागरे, निवृत्ती इंगोले, गणेश बोलकर, स्वप्नील पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.पदाधिकाऱ्यांकडून स्वागतनाशिक मनपाच्या प्रभाग क्रमांक १० ड मधून बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या इंदूबाई सुदाम नागरे अधिकृत घोषणा २४ जून रोजी करण्यात येणार होती. त्या अनुषंगाने सोमवारी सकाळी सातपूर विभागीय कार्यालयातील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील यांनी इंदूबाई नागरे यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा करत प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक