शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गाळणाच्या जंगलातून खैरच्या लाकडांचा साठा जप्त; दक्षता पथकाने पिंजले जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 15:37 IST

मालेगाव उप वन वनविभागातील या पंचक्रोशीमध्ये सर्वत्र जंगल पसरले असून जंगलामध्ये खैर, साग आदि प्रजातीची विपूल वृक्षसंपदा आहे. यामुळे येथे वन्यजीवांची जैवविविधताही आढळून येथे.

ठळक मुद्देगुजरात-महाराष्टÑाच्या सीमेवरील नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी जंगलात घुसखोरी करणाºया गुटखा व्यवसायाशी संबंधित खैर तस्कर टोळ्यांनी मोर्चा थेट मालेगावपर्यंत वळविल्याचे सिध्द जंगलातील एका झापमध्ये तोडलेल्या खैरचा काही प्रमाणात साठा पथकाला आढळून आला आहे

नाशिक : मालेगाव तालुक्यातील उपवनविभागाच्या गाळणा, नागझिरी, पोहाणे, चिंचवे, तळवाडे, रामपुरा या गावांच्या शिवारात असलेल्या सुमारे ८० ते ९० हेक्टर जंगल नाशिक वनविभागाच्या विशेष दक्षता पथकाने पिंजून काढले. दरम्यान, जंगलातील एका झापमध्ये तोडलेल्या खैरचा काही प्रमाणात साठा पथकाला आढळून आला आहे. पथकाने हा साठा जप्त केला आहे.मालेगाव उप वन वनविभागातील या पंचक्रोशीमध्ये सर्वत्र जंगल पसरले असून जंगलामध्ये खैर, साग आदि प्रजातीची विपूल वृक्षसंपदा आहे. यामुळे येथे वन्यजीवांची जैवविविधताही आढळून येथे.

गुजरात-महाराष्टÑाच्या सीमेवरील नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी जंगलात घुसखोरी करणाºया गुटखा व्यवसायाशी संबंधित खैर तस्कर टोळ्यांनी मोर्चा थेट मालेगावपर्यंत वळविल्याचे सिध्द झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात खैरची झाडे असल्यामुळे खैर काही स्थानिक नागरिक व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांना प्रलोभने दाखवून त्यांची मने वळवून तोडून लंपास केला जात आहे. सुमारे चारशेपेक्षा अधिक झाडे कापल्याचे समोर आले आहे. या जंगलाच्या संरक्षण व संवर्धनासाठी मालेगाव उप वनविभागाच्या वतीने युध्दपातळीवर प्रयत्न करण्याची गरज असताना मुळात ‘कुंपणच शेत खातं’ अशी अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे खैर तस्करांचे जंगलात फावल्याची चर्चा पंचक्रोशीमधील गावकºयांकडून केली जात आहे.